कर्जत-जामखेड पुन्हा चर्चेत! पवार-शिंदेंचा पुन्हा सामना

Rohit pawar and Ram Shinde
Rohit pawar and Ram ShindeSaam Tv

अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार रोहित पवारांनी भाजपचा हा बालेकिल्ला बळकावल्यानंतर भाजप सैरभैर झाली आहे. दररोज एकेक कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीची वाट धरीत आहेत. आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीत मेगा भरती सुरू असली तरी काँग्रेसच अस्वस्थ आहे. कारण शहरात राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसची माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या माध्यमातून ताकद आहे. राष्ट्रवादी बळकट झाल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांनीही गेलेला गड मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. काही नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. आस्थेवाईकपणे चौकशी करीत कर्जत शहरासह परिसर पिंजून काढीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे एक्शन मोडवर आले आहेत. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी विजय मिळवित मुसंडी मारली. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले राष्ट्रवादी इन्कमिंगचे नेटवर्क विस्तारले आहे. मोठे मासे त्यांच्या गळाला लागले आहेत. अलीकडे भाजपची पडझड झाली आहे.

Rohit pawar and Ram Shinde
"नागवडे"च्या उद्याच्या सभेकडे लागले सर्वांचे लक्ष

सर्व वातावरण विरोधात गेलेले असताना न खचता पुन्हा एकदा नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास शिंदे यांनी सुरूवात केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, सरपंच काकासाहेब धांडे, किसान सेलचे सुनील यादव, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, भाजप शहराध्यक्ष वैभव शहा, युवक नेते गणेश क्षीरसागर, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, युवा मोर्चाचे विनोद दळवी, पप्पू धोदाड,अनिल गदादे, महिला आघाडीच्या मनीषा वडे, शरद म्हेत्रे, सोशल मीडियाचे गणेश पालवे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

घुले-शिंदेंची चाय पे चर्चा

प्रा. राम शिंदे गाठीभेटी घेत असताना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांची कार्यकर्त्यांसह बैठक सुरू होती. तिथे राम शिंदे यांचे आगमन झाले. दोघांनीही नमस्कार करीत एकत्र कॉफी घेतली. प्रवीण घुले पूर्वाश्रमीचे विखे पाटील परिवाराचे खंदे समर्थक होते. मात्र, मध्यंतरी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली घुले काँग्रेसची पडझड होत असताना एकनिष्ठ राहिले. मात्र या भेटीनंतर शहरासह तालुकाभर चर्चा सुरू झाली आहे.

मी हुरळून, खचून जात नाही

सत्ता, पदे येतात जातात. मात्र, आपण यशाने हुरळून ही जात नाही. अपयशाने खचून ही जात नाही. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालाय. त्यामुळे सर्वसामान्यांशी माझी नाळ जुळली आहे, ती कायम राहील.

-प्रा.राम शिंदे,माजी मंत्री.

मी आहे, त्या ठिकाणी समाधानी आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा सुरू आहे. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपरा आहे. इतर चर्चांना पूर्णविराम द्या.

- प्रवीण घुले, काँग्रेस नेते.

Edited By - Ashok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com