Bhaskar Jadhav : रामदास कदम म्हणजे तात्या विंचू;भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Thackeray Group Rally: रामदास कदम फडतूस, भंपक माणूस आहे.
Ramdas Kadam-Bhaskar Jadhav
Ramdas Kadam-Bhaskar JadhavSaam TV

निवृत्ती बाबर

Political News : रत्नागिरीतील खेड येथे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा तात्या विंचू अस उल्लेख केला आहे.

प्रत्येकाच्या घरात जाऊन बोलतोय, मला उद्धव साहेबांनी संपवलं. खरं सांगायचं तर उद्धव साहेबांनी काय बांडगुळं पाळली देवालाच माहिती आहे. आदित्य ठाकरेंनी माझ्या बाजूला बसून काम करुन घेतली आणि माझं खातं पळवलं असं रामदास कदम म्हणत आहेत. पण त्यांना साधं पर्यावरण तरी म्हणता येतं का? रामदास कदम झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आहेत, अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे. (Political News)

Ramdas Kadam-Bhaskar Jadhav
Udhav Thackeray: सभेची जय्यत तयारी! गोळीबार मैदानात ठाकरी तोफ धडाडणार; टीझरही प्रदर्शित

कोकणातील नैसर्गिक संकटात रामदास कदम फिरले का? कोरोना संकटात एकाही गावात गेले नाही. पाच वर्ष मंत्री होता, मतदारसंघात काहीही काम केलं नाही. केवळ मुलाकरिता दापोलीत निधी दिला.

एक रुपयाचं काम यांनी केलेलं नाही. आपला पोरगा निवडून यावा म्हणून पैसे आपल्या मतदारसंघात आणले. याला जर मातीत घालायचं आणायचं असेल तर संजय कदमला आपल्याकडे आणावं लागेल. आपण संजय कदम यांना आणलं आहे. रामदास कदम फडतूस, भंपक माणूस आहे. तुझी बोलती शिमग्याच्या दिवशी बंद करायची आहे, असा इशाराही भास्कर जाधवांनी रामदास कदमांना दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com