
Chhatrpati Sambhajinagar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी रंगतदार लढत होण्याच शक्यता आहे. यावरुन आता शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये दंडाची थोपटा थोपटी सुरु झाली आहे. संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढून चंद्रकांत खैरेंचं डिपॉझिट जप्त करुन दाखवेल, अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केली आहे.
संदीपान भुमरे यांच्या आव्हानावर बोलताना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं, लोकसभा निवडणूक लढवण्याची भुमरेंची औकात नाही. त्या माणसाला मी स्वतः साहेबांकडे घेऊन गेलो होतो आणि आमदारकी मिळवून दिली होती. (Latest Marathi News)
संदीपान भुमरेचे जाळे, घोटाळे मी पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा पट्ट्या तयार आहे. दंड थोपटून शिंदे गटाला चंद्रकांत खैरेंनी आव्हान दिलं आहे. (Maharashtra Political News)
चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टक्केवारी घेवून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच मतदारसंघ किंवा जिल्ह्याचा विकास न करता भुमरे यांनी स्वतःचा विकास करत दारुची दुकाने वाढवली, अशी टीकाही चंद्रकांत खैरेंनी केली होती.
या आरोपांना उत्तर देताना संदिपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत उत्तर देणार असल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकीत खैरेंचं डिपॉझिट जप्त केलं नाही तर भूमरे आडनाव सांगणार नाही, असं त्यांनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.