Ramdas Kadam : 'विरोधकांच्या पोटात नुसती आग, कारण मैदानात उतरला ढाण्या वाघ'; खेडमध्ये रामदास कदम समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

Political News : बॅनरबाजी करून विरोधकांना डीवचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.
Ramdas Kadam
Ramdas KadamSaam TV

Ramdas Kadam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभा आहे. या सभेसाठी महिन्याभरापासून शिंदे गटातील नेत्यांनी कंबर कसली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानत सभा घेतली होती. तेथेच आता शिंदे गटाची जाहीर सभा होत आहे. (Political News)

या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या याच जाहीर सभेनिमित्त सध्या रामदास कदम जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांच्या समर्थकांनी खेडमध्ये जोरदार बॅनरबाजी करून विरोधकांना डीवचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

Ramdas Kadam
Maharashtra Politics : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला भाजपचा पाठिंबा? काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

कितीही लांडगे आले तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत, कारण बाप हा बापच असतो. विरोधकांच्या पोटात नुसती आग, कारण मैदानात उतरला ढाण्या वाघ आशा आशयाचे बॅनर सर्वत्र लागले आहेत. त्यामुळे आजच्या जाहीर सभेत रामदास कदम यांची तोफ धडाडणार असल्याची चर्चा या बॅनरबाजीमुळे सुरू झाली आहे.

Ramdas Kadam
Political News : भर चौकात महिलेला मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; महिला सुरक्षित आहे का? म्हणत साधला सरकारवर निशाणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गोळीबार मैदानात खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. तसेच भव्य स्टेज बांधल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्र्यांचे भाषण हे ऐकता यावे आणि पाहता यावे या अनुषंगाने एलईडी स्क्रीन देखील उभारण्यात आलेत. मैदानाच्या चारही बाजूने भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com