Pankaja Munde News : तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का? पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सवाल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या वक्तव्याने भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Pankaja Munde News
Pankaja Munde News Saam TV

Parli News: 'देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होवू शकत नाही का ? असं वक्तव्य करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान पदावरच बोट ठेवलं आहे. परळी मतदारसंघात जल जीवन मिशन कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलतं होत्या. यावेळी स्त्री विकास करू शकत नाही का ? जेवढं पुरुषांनी दीले नाही तेव्हढे मी दिले. देशाची प्रधानमंत्री स्त्री होऊ शकते तर मी होऊ शकत नाही का ? असा सवालही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांसमोर उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याने भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Political News)

Pankaja Munde News
Political News : 'तुम्हीच वाढवलेली लोकं आहेत...', शिंदे गटाबाबत आदित्य ठाकरे-प्रवीण दरेकरांमध्ये उघड चर्चा

राजकीय वतृळात पंकडा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आजवर अनेकवेळा झाली आहे. अशात आता त्यांनी थेट पंतप्रधान (Prime Minister) पदाला हात घालायचं म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत ताई तुम्ही महिला आहात म्हणून आम्ही मत दिलं नाही असं शेजारील गावातील लोक म्हणालेत, असं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खळबळजनक गौफ्यस्फोट के लाय. त्याचबरोबर माझं काही चुकलं का ? माझ्यात काही खोट आहे का ? तुम्ही एकजुटीने साथ द्यायला पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांसह मतदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

बीडच्या (Beed) परळी मतदार संघात मुंडे बहीण भावाकडून जलजीवन मिशन योजनेच्या भूमीजनासाठी चढाओढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंकजा मुंडे या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरल्याचे चित्र देखील निर्माण झालंय. तुमच्या ताईमध्ये काय खोट असेल तर सांगा, की नको बाबा ताईचं नाव घ्यायला नको, असे प्रश्न यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना विचारले.

Pankaja Munde News
Political News : पोलीस राहुल गांधींच्या घरी चौकशीसाठी गेल्याने काँग्रेस आक्रमक; बाळासाहेब थोरात म्हणाले...

'लाज वाटते नाव घ्यायला, असं काही असेल तर सांगा. माझ्याकडून काही चुकलं का ? माझ्यात काही खोट आहे का ? माझ्यामुळे काय नुकसान झालं आहे का ?, असे प्रश्न विचारत पंकजा पुढे म्हणाल्या की, 'शेजारच्या गावात गेले तर ते म्हणाले ताई तुम्ही फक्त महिला आहेत म्हणून मतदान केलं नाही. मी म्हटले एवढा निधी देऊन सुद्धा...? महिला काय करू शकत नाही.

महिला विकास करू शकत नाही का ? जेवढं तुमच्या पुरुषांनी दिलं नाही, तेवढं ताईंनी दिलं. तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता त्याच्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हणतात का? असा सवाल करत तुम्ही एकजुटीने साथ द्या, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला लगावला आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना त्यांनी साद घातली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com