Maharashtra Gram Panchayat By Election: कडक उन्हाळ्यात गावगाड्याचे राजकारण तापणार; थेट सरपंच पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर

Maharashtra Gram Panchayat Sarpanch By Election: मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होऊन निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती आयाेगाने दिली.
Maharashtra, Maharashtra Gram Panchayat By Election News
Maharashtra, Maharashtra Gram Panchayat By Election Newssaam tv

Sarpanch By Election : राज्य निवडणूक आयोगाने थेट सरपंच रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घाेषणा गुरुवारी जाहीर केली आहे. यामुळे उन्हाळ्यात पुन्हा ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापणार आहे. (Maharashtra News)

Maharashtra, Maharashtra Gram Panchayat By Election News
Gautami Patil Dance : सबसे कातील गौतमी पाटीलला धक्का; असं काय घडलं की मागावी लागली माफी, जाणून घ्या कारण

राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंच रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार असल्याची माहिती दिली आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचे निधन, राजीनामा, अपात्र किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही पोटनिवडणुक असणार आहे.

Maharashtra, Maharashtra Gram Panchayat By Election News
Corona चा धाेका वाढला, साता-यानंतर 'या' जिल्ह्यात बॅंक, शाळांसह महाविद्यालयांत मास्क वापर अनिवार्य

या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. उमेदवारी अर्जाची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. उमेदवारी अर्ज ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल असेही आयाेगाने नमूद केले.

१८ मे २०२३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होऊन निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती आयाेगाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com