नांदेड जिल्ह्यात तीन नगरपंचायतीसाठी मतदान; 51 जागांचा उद्या लागणार निकाल!

नायगाव - 78.30,अर्धापूर - 81, माहूर 78.टक्के सरासरी मतदान
नांदेड जिल्ह्यात तीन नगरपंचायत निवडणूक; 51 जागांचा निकाल उद्या लागणार !
नांदेड जिल्ह्यात तीन नगरपंचायत निवडणूक; 51 जागांचा निकाल उद्या लागणार !SaamTV

नांदेड : नांदेड जिल्ह्य़ातील तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याने झालेल्या पेचामुळे मतमोजणी महिनाभर लांबणीवर पडली होती. आज उर्वरीत अकरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून नायगाव मध्ये तीन जागांसाठी सरासरी 78.30 टक्के मतदान झाले.

हे देखील पहा :

अर्धापूर मध्ये चार जागांसाठी 81 टक्के तर माहूर मध्ये चार जागांसाठी 78.18 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उद्या मतमोजणी होणार आहे. नायगाव (Naigaon) एकुण 17 जागेसाठी 40 उमेदवार, अर्धापूरात 17 जागांसाठी 86 उमेदवार तर माहूर मधून 17 जागांसाठी 84 उमेदवार निवडणूकीत उभे आहेत.

नांदेड जिल्ह्यात तीन नगरपंचायत निवडणूक; 51 जागांचा निकाल उद्या लागणार !
धावत्या टँकरमधून घातक सल्फ्यूरिक ऍसिड अंगावर पडल्याने ४ नागरिक गंभीर जखमी!

विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे उद्या कळणार आहे. तीन ही नगर पंचायतीची मतमोजणी (Counting) सकाळी त्या त्या तहसिल कार्यालयात होणार आहे. मतमोजणी ची संपुर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com