ग्रामपंचायतींमधील 7 हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान!

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायतींमधील 7 हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान!
ग्रामपंचायतींमधील 7 हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान!SaamTvNews

-- सुशांत सावंत । जयेश गावंडे --

मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

हे देखील पहा :

श्री. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल.

त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकाणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.

ग्रामपंचायतींमधील 7 हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान!
Beed : अवैध गुटखा विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाला अटक करा

अकोला जिल्हा ग्रामपंचायत पोटनिवडणूक स्थिती :

अकोला जिल्ह्यातील 198 ग्रामपंचायतींच्या 398 सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या असून यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 21 डिसेंबर ला मतदान होणार असून 23 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

अकोला जिल्ह्यात 198 ग्रामपंचायत मधील 398 जागा रिक्त झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केल्याने. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पाठोपाठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावकारभाऱ्यांना निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com