बीड जिल्ह्यावर पाणी संकट येण्याची शक्यता; 24 टक्केचं उपयुक्त पाणीसाठा

जिल्ह्यातील 144 लहानमोठ्या पाणीसाठ्या प्रकल्पांपैकी 84 प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सर्व पाणी प्रकल्पांत एकूण 24 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - जिल्ह्यावर भर पावसाळ्यात पाणीसंकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील 144 लहानमोठ्या पाणीसाठ्या प्रकल्पांपैकी 84 प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सर्व पाणी प्रकल्पांत एकूण 24 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू झालाय मात्र अद्यापही धरणे तहानलेलीच आहेत. शेतकऱ्यांसह (Farmer) सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. बीडमध्ये (Beed) पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील असणाऱ्या प्रकल्पामधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आटला आहे.

हे देखील पाहा -

गेल्या महिनाभरामध्ये जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड यासह इतर काही भागामध्ये पाऊस झाला आहे. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं धरणे कोरडी पडू लागली आहेत

Beed News
एकनाथ शिंदेंचे मंत्रिमंडळ आज ठरणार? गोव्यात आज होणार बैठक

दरम्यान जिल्ह्यातील 144 पैकी 36 पाणीसाठा प्रकल्पांत 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 20 प्रकल्पांत 50 टक्क्यांहून अधिक पाणी उपलब्ध आहे. तर केवळ 2 प्रकल्पांत 50 ते 75 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. जुलै महिन्यात पाऊस झाला नाही, तर उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यावर पाणी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जिल्हावासीयांना मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. पाऊस आला नाही तर पिके जळून जातील. अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची भीषणटंचाई निर्माण होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com