वीजसंकट: चंद्रपुर वीज केंद्रात सातपैकी केवळ तीनच संच सुरू...

कोळशाच्या उत्पादनात आणि वाहतुकीत कमालीची घट झाल्यानं राज्यातील वीज केंद्रे संकटात सापडली आहेत.
वीजसंकट: चंद्रपुर वीज केंद्रात सातपैकी केवळ तीनच संच सुरू...
वीजसंकट: चंद्रपुर वीज केंद्रात सातपैकी केवळ तीनच संच सुरू...Saam Tv News

चंद्रपुर: कोळशाच्या उत्पादनात आणि वाहतुकीत कमालीची घट झाल्यानं राज्यातील वीज केंद्रे संकटात सापडली आहेत. राज्यातील विजेची मागणी वाढत असताना या संकटामुळे ती निम्म्यावर आली आहे. गेल्या महिनाभरापासून ही स्थिती कायम आहे. (Power Crisis: Only three out of seven sets are operational at Chandrapur Power Station)

हे देखील पहा -

चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता येथील बहुतांशी कोळसा खाणी या भूतल आहेत. त्यामुळं पावसाचं पाणी त्यात साचतं आणि उत्पादन ठप्प होतं. ही स्थिती या पावसाळ्यात अनेकदा निर्माण झाली. त्यामुळे चंद्रपूर वीज केंद्राला आवश्यक कोळसा पुरवठा होऊ शकलेला नाही. चंद्रपूर वीज केंद्राची कोळशाची मागणी 35 हजार टन प्रतिदिन एवढी आहे. मात्र हा पुरवठा होत नसल्याने इथले सातपैकी केवळ आता केवळ तीन संच सुरू आहेत. स्थापित क्षमतेच्या निम्मी वीज निर्मिती सुरू आहे. कोळसा पुरवठा नसल्याने हे युनिट बंद करावे लागल्याची माहिती आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर औष्णिक वीज केंद्रांची आहे.

वीजसंकट: चंद्रपुर वीज केंद्रात सातपैकी केवळ तीनच संच सुरू...
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहरात सकाळपासून सुरुवात

केवळ एक ते दीड दिवस पुरेल एवढाच साठा सध्या वीज केंद्रांकडे शिल्लक आहे. त्यामुळं राज्यावरील वीज संकट चांगलंच गहिरं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऐन दसरा-दिवाळीत हे संकट उभं ठाकल्यानं यातून कसा मार्ग काढला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.