Bacchu Kadu News : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? 15 मतदारसंघात प्रहारची स्वबळाची तयारी

Political News : निवडणुकीपूर्वी काही दगाफटका झाल्यास आपली तयारी असावी म्हणून बच्चू कडू यांनी कंबर कसली आहे.
Mla Bacchu Kadu
Mla Bacchu Kadu Saam Tv

Nagpur News : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी 15 मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. महायुती मध्ये स्थान न मिळाल्यास स्वतंत्रपणे पक्षाची लढण्याची तयारी असावी म्हणून बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणी सुरु केली आहे.

प्रहार पक्षाने यासाठी 15 विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे. सध्या बच्चू कडू महायुतीमध्ये आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी काही दगाफटका झाल्यास आपली तयारी असावी म्हणून बच्चू कडू यांनी कंबर कसली आहे. (Political News)

Mla Bacchu Kadu
Wife Killed Husband : पैशांपुढे नातं हरलं! जमिनीच्या वाटणीसाठी पत्नीने पतीलाच संपवलं

याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, आम्ही युतीमध्ये असलो तरी आमची घरं वेगळी आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे आमचं घर मजबूत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय वादळात आमचं घर पडू नये. आमचं घर मजबूत राहावं आणि या घरातून सामान्य नागरिकांची घरं मजबूत राहावी हा आमचा प्रयत्न आहे.

काही मतदारसंघांची आम्ही चाचपणी केला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील १५-१६ मतदारसंघात पक्षबांधणीचं काम सुरु आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Mla Bacchu Kadu
Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित! मनसे- ठाकरे गटाकडून सरकारवर सडकून टीका

उमेदवार कोण असेल?

प्रहार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार वैचारिक असावा. आम्ही ज्यासाठी लढतोय त्यांची जाणीव त्याला असावी. शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, घरकामगार, वंचित पिछड्या नागरिकांसाठी काम करण्यासाठी त्याने समर्पित असायला हवं. त्याचं स्वत:चं काम समाजात असावं, असा उमेदवार आम्हाला हवा आहे. उद्या आमचंही इतर पक्षासाठी होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असेल, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com