महाराष्ट्रातील काँग्रेसचे मंत्री कणा नसलेले; प्रकाश आंबेडकरांची टीका

''अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनसेचे महत्व वाढले आहे.''
महाराष्ट्रातील काँग्रेसचे मंत्री कणा नसलेले; प्रकाश आंबेडकरांची टीका
Prakash AmbedkarSaamTvNews

पंढरपूर: राज्यात व देशात काँगेस (Congress) गर्भगळीत झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे मंत्री तर कणा नसल्या गत झाले आहेत. ते शरद पवार यांचे ऐकतात की सोनिया गांधींचे? असा प्रश्न उपस्थित करत बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भवितव्या बाबत चिंता व्यक्त केली आहे. ते आज पंढरपुरात बोलत होते. पत्रकारांशी‌‌ बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षण मुद्दयावरून केंद्रातील भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनसेचे महत्व वाढले आहे. त्यांच्या भोंग्याच्या मुद्द्यामुळे मनसेला राजकीय फायदा झाला आहे. त्यांची ही भूमिका शिवसेना आणि भाजपसाठी अडचणीची ठरणारी आहे. राज्यातील सर्व महापालिकेमध्ये मनसेचे नगरसेवक दिसतील असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या म्हणून निवडणूक आयोगाला वंचित बहुजन आघाडी ने नोटीस दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला फौजदारी गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तर निवडणुका घ्याव्या लागतील.

प्रकाश आंबेडकर यांनी राणा दाम्पत्यावरही टीका केली आहे. जेलवारीपासून वाचण्यासाठी राणा दाम्पत्याची ही धडपड सूरू आहे. त्यांच्यावर खोट्या जात प्रमाणपत्राचा फौजदारी गुन्हा भाजप सरकार ने दाखल केला होता. त्यामुळे खासदार की वाचवण्यासाठी हनुमान चालिसा वाचवण्यासाठी त्यांचा हा देखावा असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.