Shivsena-VBA Alliance: आमचं फार जुनं भांडण आहे...; युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांकडे व्यक्त केली ही अपेक्षा

शरद पवार आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो
Shivsena-VBA Alliance
Shivsena-VBA AllianceSaam TV

मुंबई(Mumbai) : शिवसेना(Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीच्या ऐतिहासिक युतीची आज घोषणा झाली आहे. युतीच्या घोषणेनंतर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना सोबत येण्याचं आवाहन केलं. शरद पवार आणि आमचं भांडण फार जुनं आहे. नेतृत्वातलं भांडण नाही दिशेचं भांडण आहे. त्यामुळे शरद पवार(Sharad Pawar) आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा मी बाळगतो, असं प्रकाश आंबेडकारांनी म्हटलं आहे.

शरद पवार आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो

शदर पवार आणि आमचं भांडण फार जुनं भांडण आहे. हे नेतृत्वातलं भांडण नाही दिशेचं भांडण आहे. ते आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा मी बाळगतो, असे प्रकाश आंबेडकारांनी म्हटलं आहे.

राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना शेती व्यवसायापासून पाहिले पाहिजे. सामान्य माणसाला शेतीकरून हवा तसा नफा मिळवता येत नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी विशेष उपाय योजना आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतीतून सामान्य माणसाच्या हातात रोजगार कसा येईल हे पाहणं महत्वाचं आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Shivsena-VBA Alliance
Devendra Fadnavis On Uddhav Thackery | उद्धव ठाकरेंवर फडणवीसांची घणाघाती टीका

उपेक्षितांच राज्य येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले

या युतीमुळे निवडणुकीमध्ये एक बदलाचं राजकारण सुरु होईल. गेली अनेक वर्ष उपेक्षितांच राज्य येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जिंकून येणं हे मतदारांच्या हातात आहे हे आमच्या हातात नाही. उमेदवारी देणं आमच्या हातात असतं. नातेवाईकांच राजकारण वाढत गेलं तसं बाकीचं राजकारण बाजूला पडत गेलं. लुटारुंच राजकारण पूढे येत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Shivsena-VBA Alliance
Prakash Ambedkar : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार का? प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस...'

नरेंद्र मोदी यांचा देखील अंत होणार आहे

आज इडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडर संपवण्याचा काम सुरु आहे. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. नरेंद्र मोदी यांचा देखील अंत होणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com