मुंडे कुटुंबाचे राजकारण भाजप संपू पाहत आहे : प्रकाश शेंडगेंचा आरोप

मात्र, ऐन वेळी भागवत कराड (Bhagvat Karad) यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले, त्यावरुन पंकजा मुंडे (pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) नाराज असल्याचे बोलले जात आहे.
मुंडे कुटुंबाचे राजकारण भाजप संपू पाहत आहे : प्रकाश शेंडगेंचा आरोप
मुंडे कुटुंबाचे राजकारण भाजप संपू पाहत आहे : प्रकाश शेंडगेंचा आरोपSaam tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यात मुंडे परिवारात नाराजी नाट्य सुरू झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची बातमी समोर येताच यात मुंडे कुटुंबातील एका व्यक्तीला स्थान मिळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, ऐन वेळी भागवत कराड (Bhagvat Karad) यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले, त्यावरुन पंकजा मुंडे (pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर भाजपचे माजी आमदार आणि ओबोसी नेते प्रकाश शेंडगे (prakash Shendge) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Prakash Shendge has accused the BJP of ending the politics of the Munde family)

मुंडे कुटुंबाचे राजकारण भाजप संपू पाहत आहे : प्रकाश शेंडगेंचा आरोप
कैद्यांचा जामिन मिळूनही जेलबाहेर जाण्यास नकार (पहा व्हिडिओ)

''भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सहभाग न करत भागवत यांना दिलेली संधी हा वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष वाढवला त्यांना ही त्रास देण्याचा प्रयत्न भाजप ने केला होता. आता त्यांच्या कुटुंबाचे राजकारण भाजप संपू पाहत आहे, हे चुकीचे आहे असा आरोप भाजपचे माजी आमदार आणि ओबोसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंची कन्या, उच्चशिक्षित खासदार, ओबीसी चेहरा अशा सगळ्या मजबूत बाजू लक्षात घेता यावेळी प्रीतम मुंडे यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. दिल्लीहून आपल्याला नक्की बोलावणं येईल अशी त्यांना खात्रीही होती. मात्र त्यांना बोलावणं आलं नाही. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व अफवा असून मुंडे भगिनीं नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करुन नका, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com