नाणार वरुन जठारांनी खासदार राऊतांवर साधला निशाणा, म्हणाले...

नाणार वरुन जठारांनी खासदार राऊतांवर साधला निशाणा, म्हणाले...
pramod jathar vinayak raut

रत्नागिरी : नाणार प्रकल्पास nanar refinery project शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पाठिंबा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील या प्रकल्पच्या बाजूने आहे असे विधान भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रमोद जठार pramod jathar यांनी येथे केले. आता केवळ शिवसेना खासदार विनायक राऊत vinayak raut यांचे प्रबाेधन करण्याची आवश्यकता आहे अशी टीका त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर केली. माजी आमदार प्रमाेद जठार हे येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

pramod jathar vinayak raut
माजी आमदार सुरेश इंगळेंचे निधन; काॅंग्रेस कार्यकर्त्यांत हळहळ

जठार यांनी येत्या १९ ऑगस्टपासून सुरु हाेणा-या जनआशिर्वाद यात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बाेलावली हाेती. त्यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. प्रारंभी माजी आमदार प्रमाेद जठार यांनी जनआशिर्वाद यात्रेबाबत माहिती दिली. ते म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली येत्या १९ ऑगस्टपासून मुंबई येथून जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ हाेत आहे. मुंबई येथे १९, २० ऑगस्ट, वसई - विरार येथे २१ , दक्षिण रायगड येथे २३, चिपळूणला २४, रत्नागिरीत २५ ला आणि सिंधुदुर्ग येथे २६ 24 ऑगस्टला यात्रा येईल असे नमूद केले.

नाणार प्रकल्प व्हावा अशी आग्रही भुमिका जठार यांची आहे. त्यांनी हा प्रकल्प होण्यासाठी अनेकवेळा शासन दरबारी मागणी केली आहे. पुर्वी सेनेचा या प्रकल्पास विराेध हाेता. परंतु आता ताे राहिलेला नाही. तरी खासदार विनायक राऊत यांचे प्रबाेधन करण्याची गरज असल्याचे जठार यांनी नमूद केल्याने पुन्हा एकदा प्रकल्पावरुन येथील राजकीय घमासान सुरु हाेणार की काय असे चिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com