पाणीप्रश्नावरुन अजित पवारांच्या टीकेला प्रणिती शिंदेंचं उत्तर; भाजपवरही साधला निशाणा
Praniti Shinde's answer to Ajit Pawar's criticism on the water issue; BJP was also targeted Saam Tv

पाणीप्रश्नावरुन अजित पवारांच्या टीकेला प्रणिती शिंदेंचं उत्तर; भाजपवरही साधला निशाणा

Praniti Shinde On Ajit Pawar BJP : यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधत भाजपने दुहेरी पाईपलाईनसाठी एक वीटही रचली नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

सोलापूर: सोलापूरमधील पाणीप्रश्नावर राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यावर टीका केली होती. "सोलापूर (Solapur) जिल्ह्यात एकाचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र तरीही त्यांना पाण्याचा प्रश्न काय आहे" अशी टीका अजित पवारांनी नाव न घेता सुशिलकुमार शिंदे यांच्यावर केली होती. अजित पवारांच्या या टीकेला आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधत भाजपने दुहेरी पाईपलाईनसाठी एक वीटही रचली नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. (Praniti Shinde's answer to Ajit Pawar's criticism on water issue; BJP was also targeted)

हे देखील पाहा -

...दोनशे वर्षे सोलापूरकर पाणी पिणार

कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अजितदादा काय म्हणाले मला माहिती नाही मात्र सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काय केले हे सर्व सोलापूरकरांना माहिती आहे. उजनीची पाईपलाईन शिंदे साहेबांनी आणली. त्यातूनच येणाऱ्या दोनशे वर्षे सोलापूरकर पाणी पिणार आहेत. सोलापूरला आठ दिवसांआड पाणी पुरवठा होण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपने दुहेरी पाईपलाईनसाठी एक वीटही रचली नाही. ज्यावेळी सोलापूरसाठी पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता त्यावेळी शिंदे साहेबांनी तो मिळवून दिला असं त्या म्हणाल्या आहेत.

मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण

प्रणिती शिंदे काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण होतेय. ज्याठिकाणी महागाई किंवा भाववाढ कमी व्हायचे सोडून रोजगार कमी झालेत. देशात जॉबलेस नव्हे तर जॉब लॉस झालाय आणि तुम्ही म्हणताय जीडीपी वाढतोय. मात्र देशात दोन लोकांमुळे जीडीपी वाढतोय (अदानी आणि अंबानी) आणि सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाहीत. जेव्हा देशावर आर्थिक संकटं येतात तेव्हा मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण केले जाते. ही फक्त दिशाभूल करण्याची गोष्ट आहे. जेव्हापासून ते सत्तेत आले तेव्हापासून सगळीकडे जातीपातीचे राजकारण सुरु आहे. आपल्या देशासाठी हा खूपच विचित्र आणि वाईट काळ आहे. याच्याविरुद्ध आपण सर्वांनी फक्त बोलणेच नव्हे तर वागणे देखील गरजेचे आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

भाजपला ओव्हर कॉन्फिडंस

राज्यसभा निवडणुकात होणाऱ्या फोडाफोडीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आम्हाला घोडेबाजार करायची गरज नाही. आमच्याकडे आकडे आहेत. आम्ही कशाला घोडेबाजार करु? भाजपने त्यांचा उमेदवार मागे घ्यायला हवा होता. मात्र त्यांना एवढा ओव्हर कॉन्फिडंस कसा आला मला माहिती नाही. पण आमचे नंबर आणि आमचे कॅंडिडेट सेफ आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत.

नवनीत राणांबद्दल मी बोलू शकत नाही

नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढावी अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. या अमरावती लोकसभा निवडणूकीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या काही की, लोकांनी पसरवलेली ही अफवा आहे. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. आमच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली असेल तर मला माहिती नाही असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे.

Praniti Shinde's answer to Ajit Pawar's criticism on the water issue; BJP was also targeted
औरंगाबादमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेला पोलिसांची परवानगी; मात्र घातल्या 'या' १६ अटी
जिल्हास्तरीय चिंतन शिबीर होणार

कॉंग्रेसच्या चिंतन शिबीराबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशव्यापी चिंतन शिबाराच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिबीर आयोजित केले होते, त्याच धर्तीवर आता जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात ९ ते १४ तारखेदरम्यान जिल्हास्तरीय चिंतन शिबीर होणार अशी माहिती त्यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या की, ज्या राज्यात आमचे सरकार आहे तिथे प्रलंबित नोकरी भरती, मुलींना सायकल वाटप करण्यावर आमचा भर असणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ५० टक्के युवकांना किंवा ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांना संधी देणार असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच कॉंग्रेस रस्त्यावर आहे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंदोलने करणार आहोत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com