माझा मित्र राजीव असा कधीच वागला नाही, तुम्ही सल्लागार बदला

प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी नेते
प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी नेते

अहमदनगर ः राजळे आणि ढाकणे कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी अॅड. प्रताप ढाकणे आणि कै. राजीव राजळे यांचे संबंध सलोख्याचे होते. आता राजीव राजळे हयात नाहीत. त्यांच्या पत्नी मोनिका या आमदार आहेत. आणि प्रताप ढाकणे राष्ट्रवादीत म्हणजे विरोधी पक्षात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ते सक्रिय झाले आहेत. आमदार राजळे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी कै. राजीव यांचीही आठवण सांगितली आहे.

ही आठवण काढताना त्यांनी आमदार मोनिका राजळे यांना सल्लागार बदलण्याचाही सल्ला दिलाय. ते म्हणतात, माझा मित्र राजीव असा कधीच वागला नाही. तुमच्या ताब्यातील सत्तास्थाने नेमकी कोण चालवित आहे,तुम्ही तालुक्यासाठी बाराशे कोटी रुपये आणले म्हणता, मग ते पैसे गेले कुठे, असा सवालही ढाकणे यांनी उपस्थित केला आहे.

प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी नेते
नगर अर्बनचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे

येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. ढाकणे बोलत होते. नगरसेवक बंडू बोरुडे, योगेश रासने, वैभव दहिफळे उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, ‘‘तालुक्याच्या जडणघडणीत माधवराव निऱ्हाळी, बाबूजी आव्हाड, रावसाहेब म्हस्के यांच्यासह माजी मंत्री बबनराव ढाकणे व आप्पासाहेब राजळे यांचे योगदान मोठेच आहे. आज जे चाललेय ते बरे नाही. कोविडसाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदारांना मिळाला. तो नेमके कुठे खर्च झाला? हे जनतेचे पैसे आहेत. त्याचा हिशेब द्या.’’

कारखान्याची साखर चोरून विकली

पालिकेचा शहरस्वच्छतेचा ठेका मागील वर्षी ९६ लाखांना गेला. या वर्षी एक कोटी ८० लाखांना कसा दिला, मधले पैसे नेमके कोणाला मिळाले? बाजार समितीत एवढा गोंधळ केला, की मला ती ताब्यात घेऊन पश्चात्ताप वाटला. गुंडगिरी करणारे पोसू नका. चोरून कारखान्यातील साखर विकायची व बँकेलाही फसवायचे प्रकार सुरू आहेत. वेळ आली तर पुरावे देईन. माझ्या माणसांनी चूक केली तर त्यांनाही मी सोडत नाही.

तुम्ही भगवानगडाबाबतही खोटे बोललात

भगवानगड व पस्तीस गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत आमदार मोनिका राजळे यांनी केलेली घोषणा किती फसवी आहे, हे येळीचे सरपंच संजय बडे यांनी उघड केले आहे. तुम्ही किती खोटे बोलणार? आता माझे सरकार आहे. ते खोटे बोलत नाही. मी भगवानगडाची योजना पूर्ण करणार आहे, असे ॲड. प्रताप ढाकणे यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com