Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण पाडलं

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमक पाडण्यास सुरूवात झाली आहे
Pratapgad Afzal Khan Tomb
Pratapgad Afzal Khan Tomb Saam TV

Pratapgad Afzal Khan Tomb : शिवप्रताप दिनी साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अनाधिकृत अतिक्रमक पाडण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून ही कारवाई सुरू आहे. कबरीजवळ जेसीबी आणि पोकलेन मशीन तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Pratapgad Afzal Khan Tomb
IND vs ENG : T20 विश्वचषकात आज भारत-इंग्लंडमध्ये महामुकाबला; कोण कुणावर भारी? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे. सुरूवातीला ही कबर काहीच फूट जागेत होती. मात्र, त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या एकरभर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं. त्यामुळे याठिकाणी अफजलखानाचं उदात्तीकरण केलं जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. हे अतिक्रमण काढावं यासाठी २००६ मध्ये स्थानिकांनी आंदोलनही केलं होतं. (Pratapgad Afzal Khan Tomb Latest News)

तेव्हापासून वाद सुरू होता. पुढे हा वाद कोर्टातही गेला. याप्रकरणी सुनावणीस आलेल्या याचिकांवर निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने १५ ऑक्टोबर २००८ व ११ नोव्हेंबर २००९ रोजी बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला पुढे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. मात्र, सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचेच आदेश योग्य ठरवत अनधिकृत बांधकाम तोडण्याची सूचना केली.

कबरीजवळील अवैध बांधकाम पाडा असे, आदेश असताना देखील आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने याबाबत कुठलीही कारवाई केली नव्हती. अखेर आज जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मिळून संयुक्तपणे कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. गुरूवारी शिवप्रताप दिनाची पहाट उजडताच कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, अफजलखानाच्या कबरीजवळील झालेलं अतिक्रम पाडल्यानंतर समस्त हिंदु एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे मिलिंद एकबोटे यांनी साम टीव्हीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नही, असं एकबोटे म्हणाले. त्याबरोबर हा महाराष्ट्रातील समस्त शिवभक्तांचा विजय आहे. तो आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, असंही मिलिंद एकबोटे म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com