शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार - प्रवीण दरेकर

भाजपच्या हातात सत्ता द्या विकास करू - प्रवीण दरेकर
शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार - प्रवीण दरेकर
शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार - प्रवीण दरेकरSaam Tv

राजेश भोस्तेकर

रायगड - शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तळा नगरपंचायतीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पोलादपूर, तळा, पाली येथे प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकेचे आसूड दरेकर यांनी ओढले.

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने साऱ्याच पक्षाचे नेते हे प्रचार करण्यात मग्न होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या आज पोलादपूर, तळा, पाली येथे जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. तळा येथील जाहीर सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करून भाजपच्या हातात सत्ता द्या विकास करू असे आश्वासन दरेकर यांनी दिले आहे.

हे देखील पहा -

निवडणूक प्रचार दौऱ्यात दरेकर यांनी तळा येथे जाहीर सभेला संबोधित केले. या  सभेत बोलताना, शिवसेना नेत्याला न्याय नाही दिलात तर सामान्य जनतेला काय द्याल?असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. तुमचे पोट कधी भरणार? खासदार तुम्ही, तुम्हीच पालकमंत्री, सत्तेत मांडीला मांडी लावून बसता. आणि इथे एकमेकांना शिव्या घालता. जनतेला काय मूर्ख समजता काय? जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दरेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला. तळ्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. स्वत: मी येऊन तळ्याच्या विकासासाठी काळजी घेईन असे आश्वासन त्यांनी दिले.   

शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार - प्रवीण दरेकर
Pune : शिवसैनिकांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट!

ज्यांनी राजकारणात मुजोरी केली त्यांना पाणी पाजल्याशिवाय तळ्यातील जनता स्वस्थ बसणार नाही. राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला धारेवर धरण्याचे काम गेली दोन वर्षे करतोय. आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल त्यांच्या उमेदवारांना पाणी पाजण्याचे काम आपण करा. तळ्यातील जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचे काम मी करीन असे आश्वासन प्रविण दरेकर यांनी तळा येथील जनतेला दिले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com