''मैत्रीला धोका देवून शिवसेनेने सत्तेसाठी शेण खाल्ले''

अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर करावे यामागणीसाठी अकलूज ग्रामस्थांचे गेल्या 24 दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
प्रविण दरेकर आणि उद्धव ठाकरे
प्रविण दरेकर आणि उद्धव ठाकरेSaam Tv

पंढरपूर: गेल्या अनेक वर्षाच्या भाजप (BJP) सोबतच्या राजकीय मैत्रीला धोका देत, शिवसेनेने (Shivsena) केवळ सत्तेसाठी शेण खाल्ले, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Opposition Leader Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केला. अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर करावे यामागणीसाठी अकलूज ग्रामस्थांचे गेल्या 24 दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्य़ासाठी विरोधी पक्षनेते श्री.दरेकर आज अकलूज येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर थेट हल्लाबोल करत, महाविकास आघाडी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले.

यावेळी श्री.दरेकर म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार राजकीय द्वेश भावना ठेवून काम करत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचातीचे रुपांतर नगपरिषेमध्ये केले जाते, मग अकलूजकरांवर अन्याय का? असा असवाल उपस्थित करत. या पळपुट्या सरकारचा लवकरच हिशोब चुकता करु. शिवसेनेने भाजप सोबत असलेली नैसर्गिक युती तोडून केवळ सत्तेसाठी विरोधकांबरोबर अनैसर्गिक युती करत, शिवसेनेने सत्तेसाठी शेण खाल्ले आहे.

प्रविण दरेकर आणि उद्धव ठाकरे
मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

न्याय मिळावा म्हणून येथील लोक उपोषणाच्या माध्यमातून मायबाप सरकारकडे मागणी करत आहेत. त्यांना आईच्या भूमिकेतून ठाकरे सरकारने न्याय देण्याची अपेक्षा आहे. पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या या सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. सरकारने न्याय दिला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरुन हिसकावून घ्यावं लागेल. त्यानंतर मात्र आम्ही पण त्यांचे सगळे हिशोब चुकते करु असा इशाराही श्री.दरेकर यांनी दिला.

सध्या सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे असला तरी तिजोरीची चावी मात्र राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बारामतीकरांच्या रिमोट कंट्रोलवर काम करतात. महाविकास आघाडी सरकारच्या नसानसात राजकारण भिनले आहे. त्यामुळेच राजकीय अभिनिवेशातून येथील जनतेला वेठीस धरले जात आहे. पण जनतेचा तळतळाट फार वाईट असतो, या सरकारने येथील जनतेला न्याय दिला नाही तर, भाजपच्या माध्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

कदाचित हे काम भाजप सरकारच्या माध्यमातून व्हावे असे नियतीच्या मनात असावं असेही दरेकर म्हणाले, सोलापूरचे पालक मंत्री अकलूज पासून जवळच राहतात. त्यांना येथील जनतेचा आवाज ऐकू येत असूनही त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. ते पालक मंत्री नव्हे तर बालीश मंत्री असल्याची टीकाही दरेकर यांनी केली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही राज्य सरकारच्या भूमिकेवर टीक करत, आंदोलन अधीक तीव्र कऱण्याचा इशारा दिला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com