पोटच्या लेकीप्रमाणचं गाईचं झालं डोहाळं जेवण! गावाकडून गोड कौतुक

गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सांगलीच्या आष्टा, या ठिकाणी पार पडला
पोटच्या लेकीप्रमाणचं गाईचं झालं डोहाळं जेवण! गावाकडून गोड कौतुक
पोटच्या लेकीप्रमाणचं गाईचं झालं डोहाळं जेवण! गावाकडून गोड कौतुकविजय पाटील

सांगली : एखाद्या सुवासिनीचा डोहाळे जेवण ज्या पद्धतीने पार पडतो. अगदी त्याच ताटामध्ये गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सांगलीच्या आष्टा, या ठिकाणी पार पडला आहे. गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वान्नांचा रेलचेल, आहेर- माहेर आणि डोहाळे कार्यक्रमासाठी आप्तेष्टांची उपस्थिती, यामुळे पंचक्रोशीत या अनोख्या गाईच्या डोहाळे कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

सांगलीच्या आष्टा या गावातील सागर सिद्ध यांच्या गायीचा पार पडलेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. सागर सिद्ध त्यांच्या कुटुंबाचे त्यांच्याकडे असणाऱ्यांनी गाई- म्हशींवर जीवापाड प्रेम आहे. यापैकी एका गाईला सध्या दिवस गेले आहेत. सातवा महिना असल्याने महिलांची जशी ओटी भरणी होते.

हे देखील पहा-

त्यापद्धतीनेच सागर सिद्ध आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा बेत केला होता. आणि याला "शिवारभरण"असे कार्यक्रमाचे नाव देऊन आप्तेष्टांना निमंत्रण धाडले होते. तसे पाहिले तर अनेक ठिकाणी गायीच्या डोहाळेचा कार्यक्रम पार पडतात. सागर सिद्धं यांनी आयोजित केलेल्या त्यांच्या गाईच्या डोळ्याचा कार्यक्रम हा इतरांच्या पेक्षा थोडा वेगळा ठरला आहे.

पोटच्या लेकीप्रमाणचं गाईचं झालं डोहाळं जेवण! गावाकडून गोड कौतुक
इलेक्टोरल बॉंड्समधून शिवसेनेची कमाई, शिवसेना दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष (पहा व्हिडिओ)

कारण अगदी एका सुवासिनी महिलेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात इतपत सुरेख आणि सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. अगदी त्यांनी आपल्या गाईला भरगच्च अशा स्वरुपात सजवले होते. फुलांच्या पासून तिच्या अंगावर मखमली झुला, साडया, कंकण अशा पद्धतीचे वेशभूषा करण्यात आली होती. तसेच पुरी- बासुंदी, खाजा, जिलेबी, लाडू, तळलेल्या पदार्थ, फळे अशी पंचपकपानाची मांदियाळी तयार करण्यात आली होती.

इतकेच नव्हे, तर डोहाळे वडाच्या निमित्ताने कार्यक्रमाला हजर असलेल्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना आहेर- माहेर सोबत गायीच्या प्रतिमेचा फोटो देण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला आहे. गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.