Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!

पोलीस दलातील पतीच्या सतत मारहाणीच्या जाचास कंटाळून, 7 महिन्याच्या गर्भवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, बीडच्या केज तालुक्यातील दरडवाडी येथे समोर आलाय.
Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!
Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!विनोद जिरे

बीड : पोलीस दलातील पतीच्या सतत मारहाणीच्या जाचास कंटाळून, 7 महिन्याच्या गर्भवतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार, बीडच्या (Beed) केज (Kej Taluka) तालुक्यातील दरडवाडी येथे समोर आलाय. लक्ष्मीच्या सणा दिवशी माहेरमध्ये आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्योती गोविंद जाधवर अस मयत महिलेचं नाव आहे. ती 7 महिन्यांची गर्भवती होती.

हे देखील पहा :

बीडच्या केज तालुक्यातील दरडवाडी येथील ज्योतीचा, पाच वर्षांपूर्वी सोलापूरच्या उक्कडगाव येथील गोविंद जाधवर या पोलीस दलात नोकरी करणाऱ्या तरुणा सोबत विवाह झाला होता. लग्नावेळी 15 लाख रुपये हुंडा दिला. मात्र ट्रॅक्टर घेण्यासाठी आणखी पैसे घेऊन ये, या मागणीसाठी पती गोविंद वारंवार ज्योतीला मारहाण करत होता. दोन दिवसापूर्वी ज्योतीला पतीने मारहाण करून रात्री तीनच्या सुमारास, माहेरी दरडवाडी येथे सोडून गोविंद जाधवर हा गावी वापस गेला होता.

Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!
Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!
Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!
Crime : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!

काल मुलीने घरातील वडील भाऊ आई व इतर सदस्य शेतात गेल्यानंतर, घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या पोटामध्ये सात महिन्याचे बाळ देखील होते. 3 वर्षामध्ये पती सासू, सासऱ्या सह दीराचा सतत जाच होता. असा आरोप मयत पीडितेच्या भावाने केला आहे. ज्योतीचा पती हा उस्मानाबाद पोलिस दलामध्ये कार्यरत असून कायद्यामध्ये काम करणाऱ्या रक्षकाने पत्नीला जाच केला. त्यामुळे आत्महत्या झाली असा आरोप परिवारातील सदस्य करत आहेत. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com