लस उपलब्ध असतानाही गोंदिया जिल्ह्यात गर्भवती महिलांची लसीकरणाकडे पाठ

लसीकरणासाठी गर्भवती महिला पुढे येत नाहीत. त्यामुळे गर्भवती महीलांचे लसीकरण कसे करायचा असा प्रश्न आता आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे.
लस उपलब्ध असतानाही गोंदिया जिल्ह्यात गर्भवती महिलांची लसीकरणाकडे पाठ
गर्भवती महिलाSaam Tv

गोंदिया जिल्ह्यात (Gondiya District) पाच लाखाच्यावर लसीकरण झाले. लसीकरणात (Vaccination) पुरूषापेक्षा महीला अग्रेसर असल्या तरी एकाही गर्भवती महीलांनी कोरोना लस घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात आजघडीला 6444 गर्भवती महीला आहे. दोन जीवाचे सांभाळ करताना लस घेतली तर अनिष्ठ तर होणार नाही या भीतीने गर्भवती महीलांनी लस घेतली नाही.

जिल्हाभरातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हास्तरावरील सर्वच शासकीय रुग्णालयात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लस उपलब्ध आहेत. परंतु, या लसीकरणासाठी गर्भवती महिला पुढे येत नाहीत. त्यामुळे गर्भवती महीलांचे लसीकरण कसे करायचा असा प्रश्न आता आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या लसी गर्भवती महिलांयाठी सुरक्षीत असल्याचे आरोग्या खायत्याने सांगितले आहे. परंतु अजूनही राज्यात लसीकरण करुण घ्यायला लोक घाबरत आहेत. कोरोनावरती विजय मिळवायचा असेल तर १०० टक्के लसीकरण करणे गरजेचं आहे. देशातील आणि राज्यातील नागरिकांनी वेळीच सतर्क होऊन लसीकरण करुण घेण्याचे आवाहन सरकार करत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com