रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृतीसाठी ध्वनिचित्रफीत तयार

नाशिक जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भरत कळस्कर यांच्या संकल्पनेनुसार वाहनधारकांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा व जीवन दूत या दोन ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आल्या आहेत.
रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृतीसाठी ध्वनिचित्रफीत तयार
रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृतीसाठी ध्वनिचित्रफीत तयारसागर गायकवाड

सागर गायकवाड

नाशिक - जिल्ह्यामध्ये अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाहन चालवताना नियमांचे पालन केल्याने अपघाताला आळा बसवण्यास निश्चितच यश मिळवता येऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर नाशिक Nashik जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भरत कळस्कर Bharat Kalaskar यांच्या संकल्पनेनुसार वाहनधारकांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा व जीवन दूत या दोन ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

या दोनही ध्वनिचित्रफीतींचे दिग्दर्शन सोनू अहिरे यांनी केले असून गायक आदर्श शिंदे व स्वप्निल बांदोडकर यांच्या आवाजातुन ही चित्रफीत साकारण्यात आली आहे. या दोनही चित्रफितींचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृतीसाठी ध्वनिचित्रफीत तयार
नांदेड- विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले; 60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

या दोनही ध्वनीचित्रफिती मध्ये वाहनधारकांनी वाहन चालवताना कशा पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे आणि नियमांचे उल्लंघन केल्याने कशा पद्धतीने अपघात होऊ शकतो हे दाखविण्यात आले आहे. या दोनही चित्रफिती विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com