राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; परळी- अंबाजोगाई महामार्ग बंद...

बीड जिल्ह्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे
राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; परळी- अंबाजोगाई महामार्ग बंद...
राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; परळी- अंबाजोगाई महामार्ग बंद... विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत असतांना, परळी अंबाजोगाई महामार्गवर कण्हेरवाडी परिसरातील नदीला आलेल्या पुरामुळे, हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशी माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय मारोती मुंडे यांनी दिले आहे.

हे देखील पहा-

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी परळी- अंबाजोगाई मार्गावर, कण्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता आणि तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने, परळी- अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये. याकरीता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्यासह 8 अधिकारी कर्मचारी परिस्थिती हाताळत आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; परळी- अंबाजोगाई महामार्ग बंद...
Konkan Rain Update : दापोली- चिपळूणला सतर्कतेचा इशारा

दरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असताना, याठिकाणी अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्याने, जोपर्यंत पुर ओसरत नाही, तोपर्यंत महामार्ग सुरू होणार नाही. असे देखील यावेळी मुंडे यांनी फोनवरून संपर्क साधला असता सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com