
मुंबई : देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतिपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती व्हावे अशी चर्चा रंगली आहे. (NCP Sharad Pawar Latest News)
युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव निश्चित झाले तर आमचे समर्थन असणार, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सुद्धा शरद पवारांचं नाव सुचवले असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार जर विरोधी पक्षाचे उमेदवार होणार असतील, सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. त्यामुळे विरोधी पक्षाची वाट आणखी सोपी होईल, असा सल्ला सोनिया गांधी यांनी दिला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे, वाईएसआर आणि बीजू जनता जल हे काँग्रेसच्या राजकीय रणनीतीला सुरूंग लावण्याची जास्त शक्यता आहे.
जर शरद पवार यांना विरोधी आघाडीकडून जर उमेदवारी देण्यात आली तर या दोन्ही पक्षांसोबत संवाद साधणे आणखी सोपे होणार आहे. पण अजूनही बीजू जनता दल आणि वाईएसआर हे काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक असल्याचे चित्र आहे. पण, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी होकार कळवता की नकार कळवता, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.