पुजाऱ्याचा 'अघोरी' प्रकार, विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार तर मुलीवरही अतिप्रसंग

देवाने मला खास तुझ्यासाठी पाठवले आहे, असे म्हणत या विवाहितेवर तब्बल ६ वर्षे अत्याचार केला.
पुजाऱ्याचा 'अघोरी' प्रकार, विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार तर मुलीवरही अतिप्रसंग
पुजाऱ्याचा 'अघोरी' प्रकार, विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार तर मुलीवरही अतिप्रसंगSaamTv

नांदेड - नांदेड - शहरातील गोपाळ चावडी परिसरातील एका देवीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याने एका विवाहितेवर ६ वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवाने मला खास तुझ्यासाठी पाठवले आहे, असे म्हणत या विवाहितेवर तब्बल ६ वर्षे अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता या आरोपीने पीडित महिलेच्या मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित महिलेने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून येत आहे.

हे देखील पहा -

या आरोपी पुजाऱ्याचे नाव श्रीपाद देशपांडे असे आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, नराधम आरोपी हा नांदेड शहरातील गोपाळ चावडी परिसरातील एका देवीचा पुजारी असून २०१५ साली आरोपी हा पीडित महिलेच्या घरी आला होता. दरम्यान यावेळी पीडित महिला आंघोळ करत होती. आरोपीने यावेळी चोरून पीडितेचे अश्लील फोटो काढले. यानंतर फोटो सोशल मीडियावर Social Media व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केले.

पुजाऱ्याचा 'अघोरी' प्रकार, विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार तर मुलीवरही अतिप्रसंग
कल्याण पश्चिमेत राष्ट्रवादीकडून निदर्शने, रास्ता रोकोचाही प्रयत्न...

दरम्यान पीडितेने विरोध केला असता, मला देवाने खास तुझ्यासाठी देवाने पाठवले आहे असं म्हणत आरोपीने विवाहितेवर अनेकदा अत्याचार केला. यातून पीडित महिला गर्भवती देखील राहिली होती. पण आरोपीने पीडित महिलेच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला होता. याप्रकरणी पीडित महिलेनं नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.