Raigad: पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार

रायगडात झालेल्या दुर्घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे.
Raigad: पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार
Raigad: पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजारSaam Tv

रायगडात झालेल्या दुर्घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. त्याच बरोबर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महाडजवळ तळीये गावावर दरड कोसळली Collapse आहे. ढगफुटी सारख्या पावसामुळे Rain डोंगराच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागामध्ये असलेल्या तळीये taliye गावावर मोठी दरड कोसळली आहे.

दरड कोसळून यामध्ये जवळपास ७२ जण गाडले गेल्याची माहिती समोर आली होती. तर या गावामध्ये ४०० ते ५०० लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. आता नविन मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढून ३८ वरती गेला आहे. अजून 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पोलादपुर तालुक्यात दरड कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Raigad: पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार
रायगडात मृत्यूचं तांडव! तळीयेत 38 तर पोलादपूरात 9 मृत्यू

गंभीर बाब म्हणजे गावामध्ये पोहोचण्याची सुद्धा काही सोय नाही. काल संध्याकाळी घडलेल्या या घटनेमध्ये अनेकांच्या मृत्यूची भीती देखील व्यक्त केली जात होती. तर संपूर्ण गावालाच पाण्याचा वेढा असल्यामुळे गावापर्यंत मदत पोहचवणं जिकीरीचं होतं. काल संध्याकाळपर्यंत एनडीआरएफ तसेच कोस्ट गार्ड हे पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रत्यक्ष गावात बचावकार्याला वेळ लागणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली होती. रात्री उशिरापर्यंत मदत पोहोचू शकलेली नव्हती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com