कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन!

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलिबाग पोलीस फरार कैद्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सगळीकडे नाकेबंदी केली आहे.
कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन!
कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन!राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग तालुक्यातील गाेंधळपाडा नेहुली येथील क्रीडा संकुलात तात्पुरत्या स्वरूपात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधून खिडकीचे गज कापून मध्यरात्री कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेने कारागृह प्रशासन आणि अलिबाग पाेलिसांची पुरती झाेप उडाली आहे. देवा मारुती दगडे वय वर्षे-24 असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव आहे. पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्यात हा कैदी अलिबाग जिल्हा कारागृहात आपली शिक्षा भोगत आहे. कोरोना संसर्ग झाल्यामुळे सध्या नेहुली येथील कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ त्याला दाखल करण्यात आले होते.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील सुमारे सत्तर कैद्यांची कोरोनाची चाचणी आठवड्यापूर्वी केली होती. या चाचणीत 68 जणांना कोरोना लागण झाली होती. काेराेना कालावधीत कैद्यांना थेट अलिबाग येथील जिल्हा कारागृहात न ठेवता आधी नेहुली येथील क्रीडा संकुलात तात्पुरत्या उभारलेल्या कारागृहात ठेवण्यात येते. फरार देवा मारुती दगडे यालाही कोरोनाची लागण झाली असल्याने तो आठ दिवसापासून उपचार घेत होता.

कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन!
विमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाड

पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कलम ३६३, ३६६, ३७६, ३२३, ३ अ/४.५ (१) (एन) ६ पाॅस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. दगडे याला १६ जानेवारी २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. १९ जानेवारी २०१८ पासून दगडे हा अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल होता. २० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कारागृहाच्या खिडकीचे गज कापून दगडे त्याने पलायन केले. या आरोपीचे शिक्षण बारावी पर्यंत झालेले आहे. व्यवसायाने दगडे हा वाहन चालक आहे. फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. कोणासही त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यास अलिबाग पोलीस ठाण्याला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गज कापण्यााठी कैद्याकडे हत्यार कसे आले? पहाटे २ च्या सुमारास गज कापत असताना पहारेकरी काय करत हाेते. त्याच्या साेबत या कृत्यात अन्य काेणी सामील आहे का याचाही तपास पाेलिस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com