जेवणात भाजी कमी दिल्याने कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; भंडारा जिल्हा कारागृहातील प्रकार

Bhandara News : जेवण करताना जास्त भाजी मागूनही न दिल्याने संतापलेल्या कैद्याने आपापसात हाणामारी केल्याचा प्रकार भंडारा जिल्हा कारागृहात घडला आहे.
जेवणात भाजी कमी दिल्याने कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; भंडारा जिल्हा कारागृहातील प्रकार
Prisoners fight each other over food in bhandara jail Saam Tv

भंडारा : जेवण करताना जास्त भाजी मागूनही न दिल्याने संतापलेल्या कैद्याने आपापसात हाणामारी (Prison Fight) केल्याचा प्रकार भंडारा जिल्हा कारागृहात घडला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) चार कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेख रफीक शेख रहमान, महेश आगासे, मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल यूसुफ शेख आणि राहुल पडोळे असे गुन्हा नोंद झालेल्या कैद्यांचे नाव आहे, अशी माहिती भंडारा पोलिसांनी दिली आहे. (Prisoners fight each other over food in bhandara jail )

हे देखील पाहा -

भंडारा जिल्हा कारागृहात देवेंद्र राऊत हे कैदी असून त्यांच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे त्यांना बॅरेक जबाबदार म्हणून काम दिले. सकाळी कैदी देवेंद्र राऊत हे भोजन वाटप करत होते. त्यावेळी कैदी शेख रफीक शेख रहमान यांनी देवेंद्र यांनी जेवणाच्या ताटात जास्तीची भाजी मागितली. मात्र, कैदी देवेंद्र यांनी न दिल्याने शेख रफीक शेख यांनी भांडण करायला सुरुवात केली. देवेंद्र यांच्या विरोधात भांडायला इतर कैदी देखील आहे. जेवणावरून भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या कैदीच्या हाणामारीत कैदी देवेंद्र राऊत जखमी झाले. झालेला प्रकार पोलिसांना कळताच मध्यस्थी करत कैदी देवेंद्र यांना त्यांच्या तावडीतून सुटका केली.

Prisoners fight each other over food in bhandara jail
खळबळ! मामा भाचा डोहात पुन्हा आढळला मृतदेह; २ दिवसांपूर्वीच...

भंडारा जिल्हा (Bhandara) कारागृहात झालेल्या हाणामारीमुळे पोलिसांनी देवेंद्र यांना मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. भंडारा पोलिसांनी या प्रकरणात ३२४ आणि ३४ भारतीय दंड संहिता कलमानुसार चार कैदीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास भंडारा पोलीस करत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com