Wardha District Jail : 'त्या' कैद्याचा वर्धा जेलमध्ये पुन्हा राडा

यापुर्वी देखील कारागृहात बंदीवानावर हल्ला झाला हाेता.
wardha crime news , wardha jail , police
wardha crime news , wardha jail , policesaam tv

- चेतन व्यास

Wardha Crime News : वर्धा कारागृहात (jail) दोन कैद्यात हाणामारी झाली. दुपट्ट्यात दगड बांधून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. बराक क्रमांक आठमध्ये घडलेल्या या घटनेची नाेंद वर्धा शहर पोलिसांत (police) दाखल करण्यात आली आहे.

शिक्षाधीन बंदी आणि न्यायदीन बंदीवानात अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात शिक्षाधीन बंदीवानाने न्यायदीन बंदीवानाला दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केल्याची घटना येथील वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बैरेक क्रमांक ८ मध्ये रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेच्या थराराने कारागृहातील इतर कैद्यांस कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. कपिल नंदकिशोर आखाडे (२६ रा. मारोती वॉर्ड हिंगणघाट) असे जखमी न्यायदीन बंदीवानाचे नाव आहे. तर शेख तौफिक शेख शाकीर असे हल्ला करणाऱ्या शिक्षाधीन बंदीवानाचे नाव आहे.

wardha crime news , wardha jail , police
Mid Day Meal : निकृष्ट पोषण आहार प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

कपिल आखाडे आणि शेख तौफीक हे दोघेही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बैरेक क्रमांक ८ मध्ये स्थानबद्ध आहे. १४ रोजी बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शिक्षाधीन बंदी शेख तौफीक हा कपिल आखाडे याच्या बिछाण्यावर बसून होता. दरम्यान तेथून कपिल आखाडे जात असताना त्याचा धक्का शेख तौफिकला लागला. या कारणातून दोन्ही बंदीवानांमध्ये चांगलाचा वाद झाला होता.

१५ रोजी गुरुवारी कपिल आखाडे हा बैरेकमध्ये असताना शिक्षाधीन बंदी शेख तौफीक याने एक दिवसापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका दुपट्ट्यात छोटे छोटे दगडं बांधून त्याची पोटली तयार करुन कपिल आखाडेवर अचानक हल्ला चढविला. या घटनेने कारागृहातील इतर बंदीवानांसह कारागृह प्रशासनांत चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी कार्यालयीन कर्मचारी यशवंत वरखडे यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. शहर पोलिसांनी याप्रकरणी शिक्षाधीन बंदीवान शेख तौफीक याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

wardha crime news , wardha jail , police
Navratri : मनसेची ५० खाेके बक्षीस याेजना; रास दांडियात जिंकल्यास सुरत, गुवाहाटी, गोवा टूर

न्यायदीन बंदीवान कपिल आखाडे याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्त निघत होते. कारागृहात असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केला. त्याला तीन टाके पडल्याची माहिती आहे. शेख तौफीक शेख शाकीर याच्यावर पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असल्याने तो शिक्षा भोगत आहे. त्याची शिक्षा संपून कारागृहाबाहेर येण्यासाठी केवळ महिनाभर वेळ आहे. मात्र, कारागृहातच त्याने न्यायदिन बंदीवानावर हल्ला केल्यामुळे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com