Ganeshotsav 2022 : सुंदर ते हात... कैद्यांनी साकारले 'बाप्पा' (व्हिडिओ पाहा)

यंदा सुमारे अकरा कैद्यांनी 650 गणेशमुर्ती तयार केल्या आहेत असेही देसाईंनी सांगितलं.
ganpati bappa, ganpati festival 2022, nashik
ganpati bappa, ganpati festival 2022, nashiksaam tv

- तबरेज शेख

Ganpati Festival 2022 : गणेशोत्सव जवळ आला आहे. काेराेनाचे संकट ब-यापैकी दूर झाल्याने यंदा भाविकांमध्ये सण साजरा करण्यासाठी माेठा उत्साह आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भक्तगण तयारीला लागला आहे. त्यामुळं बाजारात देखील सजावटीच्या वस्तूसह आकर्षक गणेशमुर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये नाशिकरोड (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमुर्ती (Ganpati Bappa) भाविकांचे आकर्षण ठरु लागल्या आहेत. (Nashik Latest Marathi News)

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये गेल्या चार वर्षांपासून गणेशमुर्ती तयार केल्या जातात. या गणेशमुर्तींना नाशिक शहरासह महाराष्ट्रातून मोठी मागणी असती. यंदा जेलरोडवरील कारागृहाच्या प्रवेशव्दारा शेजारी असलेल्या प्रगती केंद्र येथे गणेशमुर्तींचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

ganpati bappa, ganpati festival 2022, nashik
Baramati : इतिहास घडवायला अंगात धमक आणि रक्तात वेड लागतं ! वाचा दशरथ जाधवांच्या जिद्दीची कहाणी

त्याचे उदघाटन कारागृह उपमहानिरीक्षक (औरंगाबाद) योगेश देसाई अणि नाशिक पोलिस कमिशनर जयंत नाईक नवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी देसाई म्हणाले नाशिक कारागृहात एक रंगकामगार कैदी होता. त्याने ही कला इतर कैद्यांना शिकवली. तो दोन वर्षांपूर्वी बाहेर आला.

ganpati bappa, ganpati festival 2022, nashik
Yuzvendra Chahal-Dhanashree | युजवेंद्र चहलसोबत बिनसल्याच्या वृत्तावर धनश्रीनं मौन सोडलं, म्हणाली...

तरी कारागृहात मुर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. आपली कला तो इतर कैद्यांना देऊन गेला यातून कैद्यांमध्ये देखील एक सकारात्मक दृष्टिकोण निर्माण झाला असल्याचे देसाई यांनी नमूद केले. या उपक्रमामुळं कैद्यांना रोजगार मिळत असून कारागृहालाही चांगला महसूल मिळताे. यंदा सुमारे अकरा कैद्यांनी 650 गणेशमुर्ती तयार केल्या आहेत असेही देसाईंनी सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

ganpati bappa, ganpati festival 2022, nashik
Dahi Handi 2022: गोविंदांना मुख्यमंत्र्यांची साथ; दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com