राज्यात सेना-भाजप वाद शिगेला; खोतकरांना राखी बांधून मुंडेंकडून ऋणानुबंध जपण्याचा संदेश

वडिलांसोबत काम केलेल्या वडील भावाला राखी बांधण्याच्या प्रसंगाने जालन्यातील भेटीचा आनंद द्विगुणित झाला. अशी पोस्ट देखील त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केली आहे.
राज्यात सेना-भाजप वाद शिगेला; खोतकरांना राखी बांधून मुंडेंकडून ऋणानुबंध जपण्याचा संदेश
राज्यात सेना-भाजप वाद शिगेला; खोतकरांना राखी बांधून मुंडेंकडून ऋणानुबंध जपण्याचा संदेशलक्ष्मण सोळुंके

जालना : गेल्या काही दिवसांपासून भाजप सेनेतील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून या आगीत तेल ओतण्याचाच प्रकार केला. घडल्या प्रकारानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

हे देखील पहा -

मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नारायण राणेंना अटक झाल्यानं दोन्हीही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. दरम्यान, काल बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे या जालन्यात होत्या. बिडला जाताना त्यांनी जालन्यात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन औक्षण करून त्यांना राखी बांधली. तसेच खोतकर यांना राखी बांधून झाल्यानंतर प्रीतम मुंडे यांनी खोतकर यांचे आशीर्वाद देखील घेतले. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रीतम मुंडे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माञ, त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

राज्यात सेना-भाजप वाद शिगेला; खोतकरांना राखी बांधून मुंडेंकडून ऋणानुबंध जपण्याचा संदेश
Big News : माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्री मंडळात समावेश करा

दरम्यान, काल झालेल्या भेटीचे फोटो प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले आहेत. वडिलांसोबत काम केलेल्या वडील भावाला राखी बांधण्याच्या प्रसंगाने जालन्यातील भेटीचा आनंद द्विगुणित झाला. अशी पोस्ट देखील त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केल्यानं भाजप सेनेतील संबंध कितीही बिघडले तरी मुंडे आणि खोतकर परिवारातील ऋणानुबंध कायम राहतील असा संदेश त्यांनी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.