जनतेची लूट करणारं नरेंद्र माेदींचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण

मोदी सरकारच्या काळात तब्बल ६९ वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
जनतेची लूट करणारं नरेंद्र माेदींचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण
congress leader prithviraj chavan

कराड : इंधनाच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे महागाईचा भडका उडू लागला आहे. माेदी सरकारच्या धाेरणांचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (साेमवार) कराड शहरात काॅंग्रेसने तहसिल कार्यालयावर माेर्चा काढला. या माेर्चाचे नेतृत्व काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. श्री. चव्हाण यांनी बैलगाडी चालवत केंद्राच्या धाेरणाचा निषेध नाेंदविला. congress leader prithviraj chavan narendra modi petrol diesel price hike satara

congress leader prithviraj chavan
'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गत ७ वर्षांत जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली २३ लाख कोटींची वसुली केली. ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. ते म्हणाले राज्यात विरोधक सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु त्यांना काही केले यश येईना. सातत्याने सरकारला पडेल अशी वल्गना भाजप करीत आहे. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरु लागल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा नाद सोडून दिला आहे. माेदी सरकार इंधन दरवाढीवरून राजकारण करु लागले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज काँग्रेसच्या माध्यमातून उठविला जात आहे असेही आमदार चव्हाण यांनी सांगितेले.

या आंदाेलनात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगरीच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, नानासो पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, राजेंद्र यादव (आबा), धनश्री महाडिक आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com