रायगडच्या घोणसे घाटात बस दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, ३४ जण जखमी

रायगड जिल्ह्यातील घोणसे घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे.
रायगडच्या घोणसे घाटात बस दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, ३४ जण जखमी
valleysaam tv

रश्मी पुराणीक

रायगड : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घोणसे घाटात (Ghonse Ghat) एका खासगी बसला (Bus Accident) आज रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ठाणे-श्रीवर्धन असा प्रवास करणारी बस साठ फूट खोल दरीत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या भीषण अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत.बस अपघाताची माहिती मिळताच रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांची भेट घेतली.अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी तटकरे यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.अपघातात जखमी झालेल्या तीन जणांवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्यांना माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी दिली आहे.

valley
असा झाला 'त्या' तरुणीच्या खुनाचा उलगडा; सहा दिवसानंतर आरोपी गजाआड

याबाबत सविस्तर वृत्त असं की, नालासोपारा येथून निघालेली एका खाजगी बसला रायगडच्या घोणसे घाटात अपघात झाला.MH 04 FK 6616 असा अपघात झालेल्या बसचा नंबर आहे. बस पुलावरुन 60 फूट खोल दरीत कोसळली.या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाल्याचं समजते. दरम्यान, अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही व तपास सुरु करण्यात आला आहे.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.