औसा इथं नगरपालिका प्रभाग रचनेत खाजगी व्यक्ती सहभागी; नगरसेवकांचा आरोप

गोपाळ धानुरे आणि मंजुषा हजारे या दोन नगरसेवकांसह नागरीकांनी मांडला ठिय्या
Latur News
Latur Newsदीपक क्षीरसागर

लातूर - म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुका या एक युध्दच आहे. या ना त्या कारणाने लातूर जिल्ह्यातील औसा येथील नगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवीन प्रभाग रचना या एका खाजगी संगणक केंद्राच्या चालकांच्या मदतीने तयार करून मुंबई (Mumbai) इथं निवडणूक (Election) आयोगाच्या कार्यालयात सादर केल्याची घटना घडली आहे. त्याचे पडसाद आज उमटले असून पीडित मागासवर्गीय समाजाने दोन नगरसेवकांसह नागरपालिके समोरच ठिय्या मांडला आहे.

हे देखील पहा -

औसा येथील नगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार असून त्यासाठी प्रभाग रचना तयार केली जात आहे. यात डिजिटल वर्ल्ड या खाजगी संगणक केंद्राचा चालक अन्सारी हा नगरपालिका प्रशासना सोबत नवीन प्रभाग कसे असायला हवं याबाबत नवीन प्रभाग रचना अहवाल तयार केला. या नवीन प्रभाग रचना करताना मागासवर्गीय वार्डची हेतुपुरस्सरपणे तीन प्रभागात विभागणी करून फोड केल्याने मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला असल्याची भावना निर्माण झाली आहे. यावर नगरसेवक गोपाळ धानुरे आणि नगरसेविका मंजुषा हजारे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी नागरपालिकेसमोर हालकी वाजवून आंदोलन केले. या नवीन प्रभाग रचना करताना खाजगी संगणक केंद्राचा चालक राज्याच्या निवडणूक कार्यालयात जाऊन गोपनीय अहवाल सादर करताना कसा काय उपस्थित होता असा सवाल उपस्थित करत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना निवेदन दिले.

मुंबई येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील फोटो जाहीर केला असून याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रभागातील नागरिकांसह पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता. आंदोलकांनी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला असून नवीन प्रभाग रचना जातीवाद करत निर्माण केली. नागराप्लिकेच्या भोंगळ कारभाराची पोलखोल नागरसेवकांसह नागरिकांनी केल्यामुळे मुख्याधिकारी वसुधा फड यांची चांगलीच पंचाईत झाली त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com