
Beed News : जावयाची घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल मात्र बीडच्या (beed) केज तालुक्यातील विडा गावात जावयाची मिरवणूक काढली जाते ती पण चक्क गाढवावर. लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्ख गाव डीजेच्या तालावर डान्स करतं, यात महिलाही मागे राहत नाहीत. अविनाश करपे हे जावई यंदा परंपरेचे मानकरी ठरले आहेत.
सासरवाडीत जावयाचा मान मोठा पण गाढवावर बसलेला जावई आणि त्यांच्यासमोर नाचणारे मेहुणे मंडळी पाहिल्यावर ही मिरवणूक आहे का धिंड आहे ? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र बीडच्या (beed) विडा गावात वाजत गाजत गाढवावरती बसून मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. अखंडित असलेल्या या परंपरेत आतापर्यंत तब्बल 90 जावयांना गाढवावर बसून वाजत गाजत गावात मिरवले आहे.
त्यामुळे धुळवड म्हटलं की या गावचे जावई भूमिगत होतात. मात्र शेर असलेल्या जावयास मेहुणे मंडळी सव्वाशेर भेटते आणि पातळातून शोधून काढते. या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात. आणि मग सुरू होते जावयाची गदर्भ स्वारी. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान जवळबनचे जावई अविनाश करपे यांना मिळाला आहे. युवराज पटाईत यांचे ते लाडके जावई आहेत. (Maharashtra News)
हसत खेळत परंपरेचा स्विकार
आपल्या नवऱ्याची माहेरात गाढवावरती मिरवणूक काढली जाते म्हटल्यावर पत्नीच्या भावना काय असतील. प्रेम विवाह केल्यामुळे गावात घोड्यावरून तर मिरवणूक काढली नाही. आज गाढवाचा मान मिळाला. पाठीमागून चालत आलेली परंपरा असल्यामुळे हसत खेळत याला स्वीकारलं जातं.
...आता गोड वाटतंय
पाच वर्षे यांना सापडलं नव्हतो, यावर्षी देखील सापडत नव्हतो. मात्र पहाटेची येऊन घरात साप निघाला आहे असा आरडाओरडा केला. त्यामुळे बाहेर यावं लागलं. सर्व मेव्हणे मंडळींनी पकडलं. तेव्हा नाही म्हणता आलं नाही. इच्छा नसतानाही गाढवावर बसावं लागलं. मात्र आता गावकऱ्यांनी अंगठी देऊन संपूर्ण पोशाख केल्याने सुरुवातीला गाढवावर बसलेले नाराज झालेले जावई देखील आनंदाने हसू लागले. आता गोड वाटतंय असं अविनाश करपेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.