Maharashtra Politics : 'छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करण्याचं राजकारण सुरू...'; प्राध्यापक हरी नरके बरसले

हरी नरके डोंबिवलीत शिवजागरण प्रतिष्ठान तर्फे आयोजित व्याख्यानमालेसाठी आले होते.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV

अभिजीत देशमुख

Maharashtra Politics : जोपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना परिस्थिती सुरक्षित, सुयोग्य वाटत नाही तोपर्यंत निवडणूका लांबवल्या जातील, असं राजकारण सध्या शिजतंय. आत्ता तरी जनतेचे मत आहे ते सरकारच्या बाजूने नाही हे उघड आहे,असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. (Maharashtra Politics News)

हरी नरके डोंबिवलीत शिवजागरण प्रतिष्ठान तर्फे आयोजित व्याख्यानमालेसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणं हे घटनात्मक बंधन आहे त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. हे घटनेमध्ये प्रत्यक्ष लिहिलेल आहे तरीसुद्धा मधल्या काळात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्या निवडणुकीच्या संदर्भात वारंवार आदेश दिले. त्यानुसार काही निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय सुद्धा घेतल्या गेल्या नंतर अंतिम निकाल सुद्धा आले. मात्र सरकार बदलल्यानंतर जे तारीख पे तारीख सुरू आहे असल्याची टीका सरकारवर केली.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ठाकरे गटाची पुढची रणनिती ठरली! प्रमुख नेते ऍक्टिव्ह होणार; लोकांच्या भावना...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा न घेता ठराविक धर्म, समाज, वर्गाच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचा वापर करण्याचा राजकारण सुरू - हरी नरके

यावेळी बोलताना हरी नरके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून सुरू असलेल्या राजकारणाबाबत देखील राजकीय नेत्यांवर परखड टीका केली .शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा न घेता ठराविक धर्म, समाज, वर्गाच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचा वापर करण्याचं राजकारण सुरू असल्याचे सांगितले नरके यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे .परंतु सोयीनुसार शिवाजी महाराजांचा वापर करायचा आणि तोही भावनिक अंगाणी करायचा. ठराविक मुद्दे हायलाईट करायचे व इतर मुद्दे झाकून ठेवायचे. शेतकऱ्यांना शिवाजी महाराजांनी 0% दराने कर्ज देत होते असं देणारा हा जगातला पहिला आणि शेवटचा राजा असावा.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटावर काय परिणाम होणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले...

आजही शेती व्यवसाय अवलंबून असलेल्या लोकांची संख्या 55 टक्के आहे अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्या करत असताना आपल्या लोक कल्याणकारी शेतकरी धोरण राबवायचे असतील तर शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली पाहिजे मात्र तसे ते प्रेरणा न घेता ठराविक धर्माच्या विरुद्ध ठराविक समाजाविरुद्ध ठराविक वर्गाच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचा वापर करण्याचा राजकारण दिसते. हे दुर्दैवी आहे. हे शिवाजी महाराजांना छोटा व संकुचित करणे आहे त्यामुळे विधान सद्बुद्ध सुचवून येणाऱ्या पुढच्या काळात जरी व्यापक शिवाजी काळ महाराज मांडला जाणे हे तरुणांसाठी आवश्यक आहे.

यंदाचे बजेट लोकहिताच नाही, बजेट नकारात्मक - हरी नरके यांचे बजेट बाबत परखड मत

केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देखील हरी नरके यांनी ताशेरे ओढले.. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना त्यांनी देशाचे बजेट 45 लाख कोटींचा मात्र आरोग्यासाठी 89 हजार कोटीची तरतूद म्हणजे ते दोन टक्के सुद्धा रक्कम नाही असे प्रकट टीका केली. देशातले 40 टक्के लोक गरीब आहेत त्यांना खाजगी दवाखाने परवडत नाहीत शासकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर नाहीत सोयी सुविधा नाहीत. अशा वेळेला बजेट वाढवण्यापेक्षा ते वर्षानुवर्षे तेच ठेवले जाते याकडे हरी नरके यांनी लक्ष वेधलं. पुढे बोलताना कोविड मध्ये कुठे होते लोकांचे रोजगार गेले अशा परिस्थितीत रोजगार निर्मितीला स्थान दिले पाहिजे बजेटमध्ये प्रोव्हिजन करायला पाहिजे होतं. 2014 सालापासून सांगितलं जात होतं 2022 अखेरपर्यंत भारतातल्या प्रत्येक माणसाकडे घर असेल आता 2022 संपलं कोणाला घर मिळाला असा खोचक सवाल त्यांनी नाव न घेता मोदी सरकारला केलं शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा वार्ता केल्या मात्र त्या जितके उत्पन्न आहे तितके ठेवण्यासाठी काय तरतूद केली असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शिक्षण आरोग्य रोजगार घरे,वीज, रस्ते, पाणी यासाठी गोष्टींसाठी बजेटमध्ये काय आहे असं परखड सवाल त्यांनी करत मित्रांचा विकास व मित्रांचे भलं व्हावं सामान्य माणसाला मात्र काही मिळू नये अशा प्रकारचे तरतुदी अर्थसंकल्प दसऱ्याची थेट टीका त्यांनी मोदी सरकारवर केली पुढे बोलताना नेहरू, वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद ,महात्मा गांधीं, बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारत व्यापक पायावर उभा केला होता त्याचे मोडतोड चालू अशा वेळेला बजेटमध्ये सरकार काय करतोय सगळ्यात महत्त्वाचं असतं भाषण काय करता टाळ्या कशा मिळवता,लोकांना कसं फसवता याचा काही किंमत नाही.सरकारने बजेटमधून बोलले पाहिजे मात्र ते नकारात्मक आहे ते लोकहिताच नाही,असं परखड मत बजेट बाबत व्यक्त केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com