सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने

उत्तर प्रदेशातील लखिंमपुर शेतकऱ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध
सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने
सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शनेदिनू गावित

नंदुरबार : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथ शेतकऱ्यांच्या शांतीपुर्ण आंदोलनात शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चढवल्या गेल्या होत्या. यात ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याविरोधात महाविकास आघाडीने राज्यात आज बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवापूर तालुक्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी शेतकरी संघटनेने पाठिंबा देऊन नवापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत.

हे देखील पहा-

यावेळी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेचे कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांच्यावर अज्ञात माथेफिरूने खुनी हल्ला घडवून आला होता. त्याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करावे, अशी मागणी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहेत.

सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने
केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल- राजू शेट्टी

केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदा रद्द करून, शेतकऱ्यांच्या हितासाठी एम एस पी गॅरंटी कायदा लागू करावा. शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नवापूर तहसील कार्यालयात उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.