सांगोल्याच्या तहसीलदारावर कारवाईसाठी पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन...

पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Sangola News
Sangola NewsSaam Tv

पंढरपूर - अवैध उत्खनन केल्याप्रकरणी आर. के.चव्हाण कंपनीला गौणखनिज विभागाने 14 कोटी 79 लाख 63 हजार रुपयांचा दंड केला‌ आहे. दंड वसुली बाबत सांगोल्याचे (Sangola) तहसीलदार अभिजीत पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. शासकिय वसुलीबाबत हलगर्जीपणा केल्या प्रकरणी तहसीलदार पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी पंढरपूरचे सामाजिक तसे कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पुणे (Pune) येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

आर.के.चव्हाण या बांधकाम कंपनीने पंढरपूर- सांगोला या रस्त्याच्या कामासाठी अवैध उत्खनन केल्याप्रकरणी गौण खनिज विभागाने 14 कोटी 79 लाखांचा दंड केला आहे. दरम्यान दंड वसुलीबाबत तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी‌ मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com