दिल्लीतील आंदोलक श्रीरामपुरात, महाराष्ट्रातून मिळणार बुस्टर

दिल्लीतील आंदोलक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.
दिल्लीतील आंदोलक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.

अहमदनगर ः नगर जिल्हा ही आंदोलकांची भूमी आहे. शेतकऱ्यांसाठीचे अनेक उठाव या जिल्ह्यातून झाले. शेतकरी संप नावाची आंदोलनाची संकल्पना याच जिल्ह्यातून उगवली होती. फडणवीस सरकार शेतकरी संपामुळे त्राही माम झाले होते. त्यामुळे दिल्लीतील आंदोलक या जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी श्रीरामपूर येथे मेळावा घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. दिल्लीतील आंदोलनास या मेळाव्यामुळे बुस्टर मिळणार आहे.

विविध राज्यातील शेतकऱ्यांना संघटित करुन सुधारीत कृषी कायद्यांमधील समज गैरसमज दूर व्हावेत, यादृष्टीने श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. औरंगाबादपासून राज्यव्यापी शेतकऱ्यांच्या मेळाव्याने शेतकरी संवाद यात्रेला प्रारंभ झाला. जोपर्यंत शेतकरी विरोधी तीन ही कायदे मागे घेतले जाणार नाही. तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार नाही. सरकारला माघार घ्यावीच लागेल. कॉर्पोरेट लोकांच्या घराणेशाहीला भाजपा सरकारचा पाठिंबा आहे.Protesting farmers from Delhi enter Shrirampur

दिल्लीतील आंदोलक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगरचे तीन खेळाडू

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ​शेती जेव्हा कार्पोरेटच्या हातात जाईल, तेव्हा अन्नधान्याचे दर देखील वाढतील. त्यामुळे भाजपा सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा राजराम सिंग यांनी दिला. केंद्रातील भाजपा सरकारच्या तीन कृषी कायदेविरोधात श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी सभा व अखिल भारतीय किसान महासभेच्या राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान येथील शेतकरी मंगल कार्यालयात ​आयोजित मेळावा (शनिवारी) पार पडला. त्यावेळी सिंग बोलत होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब सुरूडे उपस्थित होते. तर भाकपा माजी आमदार सुदामा प्रसाद, पंजाब किसान युनियन उपाध्यक्ष सुखदर्शनसिंग नठ, आखिल भारतीय किसान महासभेचे सचिव राजाराम सिंग, राजेंद्र बावके, किशोर ढमाले, सुभाष काकूस्ते उपस्थित होते.

मेळाव्यात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. दिल्लीत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुखदर्शनसिंग नठ म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था उणे २० टक्के खाली गेली. असतानाही केवळ शेती क्षेत्रामुळे ही अर्थव्यवस्था टिकून आहे. आजही ५० टक्के पेक्षा अधिक लोकांची उपजीविका ही शेतीवर चालत आहे.शेतकरी आंदोलन केवळ पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांचे नसून संपूर्ण भारतातील शेतकरी संघटित होत आहेत.

मोदी-शहा यांच्या मर्जीने चालणारे सरकार अदानी-अंबानी करीता कृषी कायदे मागे घ्यायला तयार नाही. म्हणून कृषी कायदे लोकांना समजावून संगण्याकरिता आम्ही शेतकरी सवांद यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुदामा प्रसाद, राजेंद्र बावके, किशोर ढमाले, सुभाष काकूस्ते, शोभा मंडल यांची भाषणे झाली. आमदार लहू कानडे यांनीदेखील मेळ्यास उपस्थित राहून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. जीवन सुरूडे यांनी प्रास्ताविक केले. तर शरद संसारे यांनी आभार मानले.Protesting farmers from Delhi enter Shrirampur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com