राहुल गांधींच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र तापलं; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत.
BJP Protest Against Rahul Gandhi
BJP Protest Against Rahul Gandhi Saam TV

BJP Protest Against Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद आता संपू्र्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून वीर सावरकर यांच्या जन्मभूमीत आंदोलनाला सुरूवात झाली आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे असे तिन्ही पक्ष या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नाशिक येथील सावरकरांच्या जन्मभूमीपासून या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. यात कॉंग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर सावरकर समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

BJP Protest Against Rahul Gandhi
Rahul Gandhi Threat News : राहुल गांधींना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात मिळालं पत्र

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. पुण्यात सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सारस बागेत सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावलेले बॅनर फाडण्यात आले. भाजपनेही (BJP) पुण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले. आता पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

BJP Protest Against Rahul Gandhi
Savarkar Controversy | सावरकर, राहुल गांधी आणि पुन्हा वाद!; पाहा काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये (Nashik) आंदोलकांनी घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. भागुर येथे सावरकरांच्या जन्मस्थळी असलेल्या पुतळ्याला देखील दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. यावेळी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक कर्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी काल सावरकरांवर केलेल्या टीकेचे पुरावे सादर केले. तसेच आज पहाटे कॉंग्रेसच्या कर्यकर्त्यांनी त्याचे फ्लेक्स सारस बागेतील सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावले. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com