कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या; दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबाला तातडीने राज्य शासनाने मदत करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या; दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या; दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्रSaam tv

कोरोना महामारीमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शाळा बंद आहेत त्या सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबाला तातडीने राज्य शासनाने मदत करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे. Provide immediate assistance to teachers in schools closed due to corona; Darekar's letter to the Chief Minister

सद्याच्या घडीला राज्यांमध्ये जवळपास पन्नांस हजारांपेक्षा जास्त शिक्षक Teachers विनाअनुदानित Unsubsidized शाळांमध्ये School शिकवत आहेत. निवडणुकी आधी महाविकास आघाडी सरकार MVA goverment मधील घटक पक्षांनी सत्तेवर आल्यास शिक्षकांना अनुदान देऊ असे आश्वासन दिलं होते त्यामुळे सरकारचे अनुदान मिळेल या आशेवर आजपर्यंत शिक्षक होते. मात्र कोरोनामुळे गेल्या 15 महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शिक्षकांना जे थोडेफार पगार मिळायचे ते देखील बंद झाले आहेत.

शिक्षणासारखे पवित्र ज्ञान देण्याचे काम करूनही 50,000 कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. याबबत काही मराठी वृत्तवाहीन्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या विषयावरची बातम्या केल्या होत्या. त्यावेळी असे लक्षात आले की जवळपास 50,000 कुटुंब Family आज अनुदाना अभावी उघड्यावरती आली आहेत. तसेच या बाबतीत मी स्वतः काही शिक्षकांची भेट घेतली असून ही परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबतीमधील वास्तव भयानक असल्याचही दरेकर पत्रात म्हणाले आहेत.

तसेच आपला शिक्षकीपेशा असतानाही ते सध्या शेतांमध्ये काम करत आहेत तर काही शिक्षकांना शेतीच्या काम सुध्दा मिळत नसल्याची खंतही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना CM Uddhav thackeray पाठवलेल्या पत्रातून मांडली आहे.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com