मंदिरात महिलेस छेडले; रिक्षा चालकास चाेपले, प्रकरण पाेलिसांत

मंदिरात महिलेस छेडले; रिक्षा चालकास चाेपले, प्रकरण पाेलिसांत
Crime News

बुलढाणा Crime News : बुलढाणा शहरातील मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिर परिसरात दर्शनाला आलेल्या महिलेची छेड एका रिक्षा चालकाने काढली. हा प्रकार परिसरातील नागरिकांना समजताच संबंधित रिक्षा चालकास नागरिकांनी बेदम चोप दिला.

Crime News
कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे

ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान रिक्षा चालकाने ही मारहाण करणाऱ्या जमावा विरुद्ध पाेलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी रिक्षा चालकासह, जमावा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे अधिका-यांनी मंदिर परिसरात बंदाेबस्त वाढविला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.