Pradeep Kurulkar: डॉ. प्रदीप कुरुलकरांच्या पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणीचा अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला

Pradeep Kurulkar Honey Trap: पुणे न्यायालयानं डीआरडीओचे संचालक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणी करण्यास नकार दिलाय.
Pradeep Kurulkar
Pradeep KurulkarSaam Tv

साम ब्युरो -

Pradeep Kurulkar Honey Trap:

पुणे न्यायालयानं संचालक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणी करण्यास नकार दिलाय. पुणे न्यायालयाकडे एटीएसनं मागणी केली होती. हनी ट्रपमध्ये अडकून डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेराला देशाची गोपनीय माहिती दिली होती. याप्रकरणी ते अटकेत आहेत. (Latest New On Politics)

प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईलमधून काही अ‍ॅप्स डिलीट केल्याची माहिती पुणे फॉरेन्सिक लॅबने कोर्टाला दिली होती. तसेच कुरुलकर यांनी आणखी कोणती माहिती पाकिस्तानला दिली का, याचा तपास एटीएसनं सुरू केलाय. परंतु कुरुलकर हे तपासात सहकार्य करत नसल्याचं एटीएसकडून सांगण्यात येत आहे. तसेच डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईलमधून काही ॲप्स डिलीट केले आहेत.

यासाठी त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएसनं न्यायालयाकडे केली होती. त्यासाठी एटीएसने न्यायालयात अर्ज सादर केला होता. पुणे न्यायालयानं एटीएसचा अर्ज फेटाळून लावलाय. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा आदेश दिला. या अर्जावर याआधीच सुनावणी झाली होती. त्यावर न्यायालयाने आज शनिवारी निकाल दिला.

दरम्यान, डॉ. कुरुलकर यांनी या दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला होता. पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची असते. मात्र व्हाइस लेयर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते. आरोपी तपासास सहकार्य करीत नाही. त्यामुळे न्यायालयानं व्हाइस लेयर चाचणीसाठी परवानगी द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते,यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का, अशी विचारणा एटीएसच्या अधिकाऱ्यांकडे केली.

मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी होण्यापूर्वी उपस्थित करण्यात आलेलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. परंतु एटीएस अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही.

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय

जेव्हा पोलिसांकडे एखाद्या गुन्ह्याची माहिती आहे. गुन्हेगारही आहे आणि काही पुरावेसुद्धा. गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे पुरेसे नाहीत. ते पुरावे कोर्टात टिकतील की नाही, याची जेव्हा शाश्वती नसते. तेव्हा पोलीस मधल्या मिसिंग लिंक्स जोडायला या टेस्ट्सचा आधार घेतात. तसेच एक पक्की केस तयार करतात. त्यावेळी पॉलिग्राफ टेस्टचा आधार घेतला जातो. आपण काही खोटं सांगत असतो त्यावेळी आपल्या शरीरात काही गोष्टी स्वतःहून बदलतात.

हृदयाची धडधड वाढते, श्वसनाचा पॅटर्न बदलत असतो. रक्तदाब वरखाली होत असतो. हातापायाला घाम सुटतो. याच मानकांच्या आधारे तज्ज्ञांनी एक अशी सिस्टिम तयार केलीय. ज्यातून एका व्यक्तीचा सामान्य प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे, आणि अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांना प्रतिसाद कसा असतो याचं अंतर मोजता येतं. म्हणजे एखादी व्यक्ती खरं सांगतेय की खोटं हे शरीरातील बदलामुळे सांगता येते.

Pradeep Kurulkar
Honey Trap Case: डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून पाकिस्तानला कोणती माहिती दिली? ATSकडून तपास सुरू

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com