Pune Crime: आमच्याकडे पैसे कसले मागतो?, पाणीपुरीवाल्यासोबत २ तरूणांनी केलं भयंकर कृत्य

अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv

सचिन सावंत

Pune News : पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोन तरुणांनी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजेंद्र जाठम यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यातील शनिवारवाडा समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवर ही घटना घडली आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Pune News
Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! कुर्ला-कलिना आता विनासिग्नल

हा सगळा प्रकार रविवारी रात्री पावणे ८ वाजता घडला. रविवारी रात्री पावणे ८ वाजताच्या सुमारास, २ तरुण रिक्षामधून शनिवारवाडा समोर असलेल्या शिवाजी रोड या ठिकाणी एका पाणीपुरी स्टॉलवर आले.

त्यांनी पाणीपुरी विक्रेत्याला शिवीगाळ करुन "एक पाणीपुरी दे और तू अपने भाई को बुला" असे म्हणाले. यावर कुठलंही वाद न घालता त्या पाणीपुरी विक्रेत्याने त्यांना पाणीपुरी सुद्धा दिली. पाणीपुरीचे पैसे द्या असं विक्रेता म्हणताच "आम्हाला पैसे कसे मागतो" असे हे दोघे जण म्हणाले आणि खिशातील चाकू काढून विक्रेत्यावर वार केले. चाकूच्या हल्ल्यात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला आणि त्याने थेट पोलीस (Police) ठाणे गाठले.

Pune News
Good News : डॉक्टरांना सॅल्यूट! ६व्या महिन्यांत बाळंतपण, बाळाचं वजन अवघं ५०० ग्रॅम; डॉक्टरांमुळं बाळ अन् आई ठणठणीत

फरासखाना पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात भारतीय दंडात्मक कलम ३२३,३२६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com