Pune Crime : मुलीला जेवण दिलं नाही म्हणून तिने चक्क सासूलाच संपवलं; पुण्यातील भयंकर घटना

पुण्यात चक्क सूनेनं सासूूची गळा आवळून हत्या केली.
Pune Crime
Pune CrimeSaam TV

पुणे : पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून आणखी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सुनेनं चक्क सासूचा खून (Crime) केल्याचं उघडकीस आलं आहे. सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला या वादातून ही घटना घडली. (Pune Crime News)

Pune Crime
नवी मुंबईत क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! ३६२ कोटींचे हेरॉईन जप्त

सुषमा अशोक मुळे (वय 71 रा.पंचवटी सोसायटी,चाकण) असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (वय 32) असे हत्या करणाऱ्या सुनेचे नाव असून चाकण पोलिसांनी तिला अटक केली आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते.

गुरूवारी रात्री मुलीला भाकर न दिल्याच्या रागातून सासू आणि सुनेत पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुनेनं चक्क नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या. काही वेळानंतर सुषमा यांचा मुलगा सागर हा कामावरुन घरी आला. त्यानंतर तिने पतीला सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. (Pune Todays News)

Pune Crime
पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार; अनेक पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात सामील

दरम्यान, सागरने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांना हा खून असल्याची शंका आली. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती चाकण पोलिसांना दिली. पोलिसांनी सुषमा यांचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा यांची कसून चौकशी केली असता, आपणच सासूचा खून केल्याची कबूली सुवर्णा हिने दिली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com