Khed Market Committee Election Results : आमदार दिलीप मोहितेंचा करिष्मा; खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत NCP चा झेंडा

या निकालामुळे एनसीपीचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले.
Khed Market Committee Election Results , ncp, mla dilip mohite patil,
Khed Market Committee Election Results , ncp, mla dilip mohite patil,saam tv

Khed Krushi Utpanna Bazar Samiti Election Results : राज्यातील एकेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (NCP Dilip Mohite) राष्ट्रवादी काँगेस पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार दिलीप माेहिते-पाटील यांच्या नेृत्वाखाली एनसीपीने सर्वाधिक दहा जागा मिळवताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला. (Breaking Marathi News)

Khed Market Committee Election Results , ncp, mla dilip mohite patil,
Shirdi Bandh च्या निर्णयावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

या बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३८९६ मतदारांपैकी ३८३९ मतदारांनी मतदान झाले. या निवडणुकीची शुक्रवारी रात्री मतमाेजणी पुर्ण झाली. या बाजार समितीत राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँगेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले.

Khed Market Committee Election Results , ncp, mla dilip mohite patil,
Bhor Ghat News : आता बाेरघाटातून हाेणार सुरक्षित प्रवास; CM शिंदेंचा एक निर्देश आणि सर्व सूत्रे तात्काळ हलली

राष्ट्रवादी काॅंग्रेसने 10 जागांवर यश मिळविले. याबराेबरच ठाकरे गटाने 3, भाजपने 2, काँग्रेसने 1 जागेवर यश मिळवले आहे. याबराेबच व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही निवडणूकीत विजयी झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. त्यांनी या निवडणुकीत त्यांचा करिष्मा सिद्ध केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com