पुण्यातील मावळ हादरला; ७ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या, आरोपीच्या आईनेच पुरावे केले नष्ट

मावळ मधील कोथूर्ण गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv

मावळ: मावळ (Maval) मधील कोथूर्ण गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपंचमीच्या दिवशीच इयत्ता दुसरीत शिकणारी सात वर्षीय मुलगी अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर कुटुंबियांनी शोधासोध सुरू केली. त्या मुलीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Crime News
Nitesh Rane : '...तर आमचे हात कोणी बांधले नाहीत'; कर्जतमधील 'त्या' प्रकरणावरून नितेश राणे आक्रमक

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, मावळ मधील कोथूर्ण गावात घराच्या दारात खेळत असलेली मुलगी अचानक बेपत्ता झाली. बेपत्ता झाल्याचे समजताच संपूर्ण गावाने शोध सुरू केला. शेवटी कामशेत पोलिसांना याची खबर दिली. कामशेत, वडगाव मावळ, आणि लोणावळा पोलिसांची कुमक कोथूर्न गावात आली. आणि शोध मोहिम सुरू झाली. सर्व गाव पालथे घातले मात्र या चिमुरडीचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर पुणे ग्रामीण पोलीस दलाने श्वान पथकाला पाचारण केल्यावर या गुन्ह्याचा छडा लागला.

Pune Crime News
Shivsena Vs Eknath Shinde | खरी शिवसेना नेमकी कोणाची? CM एकनाथ शिंदेंच्या ट्विटने पुन्हा चर्चेला उधाण

हाकेच्या अंतरावर आरोपीच्या घराजवळ श्वान घुटमळले आणि या मुलीच्या खुनाला वाचा फुटली. या सात वर्षीय मुलीचा मृतदेह आरोपीने झाडाझुडुपांमध्ये टाकून दिला होता. मृतदेह पाहून ग्रामस्थांनी एकच टाहो फोडला. पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि आरोपीला पोलिसांनी (Police) गावाच्या बाहेरून जेरबंद केले.

पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीची आई सुजाता महिपती दळवी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र महाराष्ट्राचा बिहार होत आहे, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. त्याला फाशीची शिक्ष व्हावी असे नागरिक मत व्यक्त करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com