Pune News: पुण्यातील अल्पवयीन चैनीसाठी करायचा घरफोड्या; पोलिसांनी केली अटक

पुण्यातील कोरेगाव परिसरात एका २१ वर्षीय अल्पवयीन मुलाने चैनीसाठी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv

पुणे: पुण्यातील (Pune) कोरेगाव परिसरात एका २१ वर्षीय अल्पवयीन मुलाने चैनीसाठी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा अल्पवयीन आहे. कोरेगाव पार्क मध्ये असणाऱ्या २ बंगल्यात ८ दिवसांपूर्वी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंद झाली होती. या प्रकरणाच्या तपासात या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Pune News
Adhir Ranjan Chowdhury: राष्ट्रपतींबद्दल अपशब्द; काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी वादात; संसदेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक

मौज मजेसाठी रात्री घर फोड्या करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक केली आहे. यातील एक आरोपी २१ वर्षाचा असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. चोरट्यांकडून ३ एलईडी टीव्ही, २ पावर स्पीकर, दोन सराऊंड स्पीकर, १ ऍम्प्लिफायर, १ बूम बॉक्स असे साहित्य जमा करण्यात आले आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क मध्ये असणाऱ्या २ बंगल्यात ८ दिवसांपूर्वी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंद झाली होती. पोलिसांनी आरोपी गणेश साखरे (२१) आणि एका अल्पवयीन तरुणाला या प्रकरणी अटक करून त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांनी या आधी देखील मुंढवा परिसरात आयफोन, ॲपल वॉच, लॅपटॉप, साउंड बॉक्स यासह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू एकूण १० लाख रुपये किंमतीच्या चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Pune News
OBC Reservation : ३६७ जागांसाठी होणारी निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार

मौज मजा करण्यासाठी हे दोघेही या सगळ्या महागड्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी चोरायचे, अशी माहिती कोरेगाव पार्कचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिली. या दोघांनी शहरात अजून कुठे चोरी केली आहे. याचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com